फेशियल किंवा क्लीन अपच्याही आधी आणि अजूनही डाळीच्या पिठाचा वापर चेहऱ्याच्या, त्वचेच्या स्वच्छतेसाठी केला जातो. यात काही जिन्नस घालून तयार केलेला मास्क खूपच फायदेशीर आहे. बेसन वापरुन केलेल्या फेस मास्कनं टॅनिंग कमी करता येईल. टॅनिंग घालवण्यासाठीच्या या सोप्या युक्तीबद्दल समजून घेऊया. या मास्कच्या मदतीनं केवळ वीस मिनिटांत टॅनिंग कमी होईल.
advertisement
Early dinner: रात्री लवकर का जेवावं ? जाणून घ्या शरीरासाठीचे फायदे
हा फेस मास्क बनवायला खूप सोपा आहे. एका भांड्यात दोन चमचे बेसन, एक चमचा मुलतानी माती, छोटं कॉफी पॅकेट, आठ-दहा थेंब लिंबांचा रस आणि दोन चमचे दही एकत्र करा. फेस मास्क तयार आहे.
चेहऱ्यावर आणि मानेवर फेस मास्क लावा, हातांनी हलक्या हातानं मसाज करा आणि वीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर, स्वच्छ पाण्यानं धुवा. याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतील. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करु शकता.
Decoction: सर्दी-खोकला झालाय ? या काढ्यानं मिळेल आराम, वाचा योगगुरुंचा सल्ला
- डाळीच्या पीठामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात आणि त्वचा उजळते.
- उन्हामुळे होणारी जळजळ मुलतानी माती कमी करण्यास मदत करते.
- कॉफीमुळे निस्तेजपणा कमी होतो.
- लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी रंगद्रव्य आणि निस्तेजपणा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
