Skin Care : चेहऱ्यासाठी सुपर कुल फेसपॅक, ओट्स आणि मधानं चेहरा दिसेल टवटवीत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे फेस वॉश, टोनर आणि फेस मास्क उपलब्ध आहेत, पण जर घरी नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी ओट्स मीलचा फेस पॅक बनवू शकता.
मुंबई : हवामानातले बदल, सूर्यप्रकाशामुळे होणारं नुकसान, हार्मोनल बदल यासारख्या अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात. मुरुम कमी करण्यासाठी पाहूया एक पटकन होणारा फेसपॅक.
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे फेस वॉश, टोनर आणि फेस मास्क उपलब्ध आहेत, पण जर घरी नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी ओट्स मीलचा फेस पॅक बनवू शकता.
त्वचेच्या गरजेनुसार, ओट्स मीलपासून अनेक प्रकारचे फेस पॅक बनवता येतात, ज्याचा वापर केल्यानं चेहऱ्यावरचे डाग गायब होतील आणि त्वचाही चमकदार दिसेल.
advertisement
ओट्समुळे त्वचा मॉइश्चरायझ एक्सफोलिएट होते. यामुळे कोरडी झालेली त्वचा शांत होते आणि डाग कमी होतात. ओट्समधील बीटा-ग्लुकनमुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
ओट्स आणि मधाचा फेस पॅक - ओट्स मील आणि मध वापरून फेस पॅक बनवू शकता. हा पॅक त्वचेला मॉइश्चरायझ करतो आणि उजळवतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी, दोन चमचे ओट्सचं पीठ, एक चमचा मध आणि थोडंसं पाणी किंवा दूध एकत्र करा.
advertisement
एका भांड्यात ओट्स पावडर, मध आणि थोडं पाणी किंवा दूध मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि पंधरा-वीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर कोमट पाण्यानं धुवा. हा ओट आणि मधाचा फेस पॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 6:27 PM IST


