Toilet Day : स्वत:च्या आणि शौचालयाच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे तुमचं आरोग्य, जागतिक शौचालय दिनानिमित्तानं जाणून घ्या सविस्तर माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तब्येत व्यवस्थित ठेवायची असेल, निरोगी राहायचं असेल तर वैयक्तिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. शौचालयाची स्वच्छता हा याचा एक महत्त्वाचा भाग आहे. शौचालयाच्या चुकीच्या सवयींमुळे हानिकारक जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार होऊ शकतो.
मुंबई : आज एकोणीस नोव्हेंबर...आज आहे जागतिक शौचालय दिवस..स्वच्छचा वसे जेथे, आरोग्य वसे तेथे हे शाळेपासून शिकवलं जातं पण त्याचा वापर आणि महत्त्व रोजच्या वापरासाठी खूपच आवश्यक आहे.
लोक सहसा यावर उघडपणे चर्चा करत नाहीत, पण ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा थेट परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावरही होतो.
तब्येत व्यवस्थित ठेवायची असेल, निरोगी राहायचं असेल तर वैयक्तिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. शौचालयाची स्वच्छता हा याचा एक महत्त्वाचा भाग आहे. शौचालयाच्या चुकीच्या सवयींमुळे हानिकारक जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार होऊ शकतो.
advertisement
शौचालयातल्या अस्वच्छतेमुळे अतिसार, मूत्र संक्रमण आणि टायफॉइड सारखे गंभीर आजार होऊ शकतात. या आंतरराष्ट्रीय शौचालय दिनानिमित्त, शौचालय स्वच्छतेबद्दल पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
शौचालय वापरल्यानंतर स्वच्छता राखणं हा पहिला नियम आहे. स्वच्छता करताना तुमच्या शरीराच्या इतर भागात चुकूनही जंतू पसरणार नाहीत याची काळजी घ्या.
advertisement
लक्षात ठेवा स्वच्छता करताना महिलांनी पुढून मागे स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे. मागून पुढे स्वच्छता केल्यानं ई. कोलाय सारखे हानिकारक जीवाणू मूत्रमार्गात येऊ शकतात आणि UTI - Urinary Track infection म्हणजेच मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.
टॉयलेट पेपरचा योग्य वापर - योग्य जाडीचा आणि दर्जेदार टॉयलेट पेपर वापरा. स्वच्छ केल्यानंतर वापरलेले टिशू टाकून द्या.
advertisement
फ्लश करण्याचा योग्य मार्ग - फ्लश करणं म्हणजे फक्त बटण दाबणं नाही. त्यासाठी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
झाकण बंद ठेवून फ्लश करा - जेव्हा तुम्ही टॉयलेट फ्लश कराल तेव्हा कमोडचं झाकण बंद करा. अशा पद्धतीनं फ्लश केलं नाही तर लाखो जंतू पाण्यासोबत हवेत सोडले जातात आणि टूथब्रश, टॉवेल, साबण इत्यादी वस्तूंवर जमा होतात आणि आजाराला आमंत्रण देतात.
advertisement
ताबडतोब फ्लश करा - वापरल्यानंतर लगेचच हात धुवा जेणेकरून दुर्गंधी आणि बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होईल.
हात धुण्यास विसरू नका - हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा नियम आहे, तरीही बरेच लोक ते गांभीर्यानं घेत नाहीत. शौचालय वापरल्यानंतर हात धुणं सर्वात जास्त महत्वाचं आहे.
साबण आणि पाण्यानं हात धुवा - फक्त पाण्यानं हात धुणं योग्य नाही. जंतू मारण्यासाठी साबणाचा वापर आवश्यक आहे. हात पूर्णपणे धुवा, बोटांच्या मधल्या भागही स्वच्छ होईल याची काळजी घ्या. हात धुण्यासाठी किमान वीस सेकंद हा आदर्श वेळ आहे. या काळात हात पूर्ण आणि स्वच्छ चोळून धुवा.
advertisement
सॅनिटायझर - साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तर अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरू शकता, परंतु ते साबणाइतके प्रभावी नाही.
शौचालयाची नियमित स्वच्छता - केवळ वैयक्तिक स्वच्छताच नाही तर शौचालयाची नियमित स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. घाणेरडं शौचालय जंतूंचं प्रजनन केंद्र बनतं.
advertisement
जंतुनाशकाचा वापर - आठवड्यातून किमान दोनदा टॉयलेट सीट, फ्लश बटण, दाराचं हँडल आणि नळ चांगल्या जंतुनाशकानं स्वच्छ करा.
टॉयलेट क्लिनरनं स्वच्छता - टॉयलेट बाऊल स्वच्छ करण्यासाठी चांगला टॉयलेट क्लिनर आणि ब्रश वापरा.
जंतू वाढू नयेत म्हणून वापरल्यानंतर ब्रश पूर्णपणे स्वच्छ करा.
वैयक्तिक वस्तू शेअर करू नका - शौचालयाच्या वस्तू कोणासोबतही शेअर करू नयेत.
प्रसाधन सामग्री शेअर करू नका - लूफा म्हणजे अंगासाठी वापला जाणारा स्क्रब , साबण आणि इतर वैयक्तिक वस्तू कोणासोबतही शेअर करू नका.
ओले टॉवेल हे बॅक्टेरियासाठी एक उत्तम प्रजनन स्थळ आहे हे लक्षात ठेवा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 12:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Toilet Day : स्वत:च्या आणि शौचालयाच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे तुमचं आरोग्य, जागतिक शौचालय दिनानिमित्तानं जाणून घ्या सविस्तर माहिती


