Breakfast : नाश्त्याच्या चुकीच्या सवयींनी होईल नुकसान, वेळीच व्हा सावध, साखर नियंत्रणाकडे द्या लक्ष

Last Updated:

इन्सुलिनची पातळी सतत वाढल्यानं वजन वाढणं, मधुमेह, हार्मोन म्हणजेच संप्रेरकांचं असंतुलन आणि थकवा यासारख्या समस्या जाणवू शकतात. पाहूयात कोणत्या सवयी हानिकारक ठरु शकतात.

News18
News18
मुंबई : रात्रीपासूनचा उपवास संपवणारा म्हणजेच Breakfast. नाश्ता म्हणजे आपल्या पोटात जाणारं दिवसातलं पहिलं अन्न. हे दिवसातील सर्वात महत्वाचं जेवण किंवा अन्न म्हटलं जातं. कारण यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि चयापचयाचा वेगही वाढतो. पण, कधीकधी नाश्त्यातल्या काही घटकांमुळे आरोग्याची हानी होते.
विशेषतः या सवयींमुळे शरीरात इन्सुलिनची पातळी अधिक वाढू शकते. इन्सुलिनची पातळी सतत वाढल्यानं वजन वाढणं, मधुमेह, हार्मोन म्हणजेच संप्रेरकांचं असंतुलन आणि थकवा यासारख्या समस्या जाणवू शकतात. पाहूयात कोणत्या सवयी हानिकारक ठरु शकतात.
रिकाम्या पोटी गोड चहा किंवा कॉफी पिणं - सकाळी उठल्यानंतर लगेच गोड चहा किंवा कॉफी प्यायल्यानं रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढू शकते. यामुळे शरीरात अचानक इन्सुलिन बाहेर पडतं, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण होऊ शकते.
advertisement
नाश्ता न करणं - नाश्ता वगळल्यानं शरीर पुढील जेवणासाठी अधिक संवेदनशील बनतं आणि त्यामुळे शरीरात जास्त इन्सुलिन सोडलं जातं.
जास्त साखर असलेले सीरियल खाणं - बाजारात मिळणाऱ्या अनेक रेडी-टू-ईट ब्रेकफास्ट सीरियल्समधे लपलेली साखर आणि रिफाइंड कार्ब्स असतात, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वेगानं वाढू शकते.
फक्त ब्रेड आणि बटर किंवा जंक फूड खाणं  - रिफाइंड ब्रेड, बिस्किटं किंवा पफ यांसारख्या नाश्त्याच्या पदार्थांच फायबर कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे इन्सुलिनमध्ये जलद वाढ होते.
advertisement
फळं खा - फळांचा रस पिण्यापेक्षा फळं खा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. त्यामुळे फळं खाण्यावर भर द्या.
प्रथिनांची कमतरता - नाश्त्यात पुरेशी प्रथिनं नसतील तर शरीराला कर्बोदकांची प्रक्रिया करण्यासाठी जास्त इन्सुलिन सोडावं लागतं.
प्रक्रिया केलेलं (processed) आणि पॅकेज्ड (packaged)अन्न खाणं - इन्स्टंट नूडल्स, पॉपकॉर्न किंवा तयार पावडर मिक्स उत्पादनांमुळे  त्यात लपलेली साखर आणि प्रिझर्वेटिव्ह इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम करतात.
advertisement
खूप वेगानं खाणं किंवा योग्यरित्या न चावणं - वेगानं जेवल्यानं पचनक्रिया बिघडते आणि साखर लवकर शोषली जाते, ज्यामुळे इन्सुलिनमधे वाढ होते.
खाण्याच्या सवयींमधे मोठे बदल करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breakfast : नाश्त्याच्या चुकीच्या सवयींनी होईल नुकसान, वेळीच व्हा सावध, साखर नियंत्रणाकडे द्या लक्ष
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement