हिवाळ्यात त्वचा नैसर्गिकरित्या मऊ ठेवण्यासाठी एक नैसर्गिक उपाय उत्तम ठरतो. रात्री चेहऱ्यावर बदामाचं तेल लावा आणि झोपा. यामुळे सकाळपर्यंत त्वचा मऊ आणि चमकदार होईल. या तेलामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते आणि त्वचेवर चमकही येते.
बदाम तेलातील पोषक घटक - हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी बदाम तेल खूप उपयुक्त आहे. यात त्वचेसाठी आवश्यक अनेक पोषक घटक असतात. बदाम तेल वजनानं हलकं असतं.
advertisement
Periods: मासिक पाळीतल्या वेदना होतील कमी, हे पदार्थ शरीराला मिळवून देतील ताकद
यामुळे त्वचेवरचा तेलकटपणा कमी होतो. बदाम तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि ओमेगा फॅटी एसिड असतात. यातील झिंकमुळे त्वचेला खोलवर पोषण मिळतं. बदाम तेलाचे इतरही अनेक फायदे आहेत.
चमकदार त्वचा - हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ शकते. बदाम तेल लावल्यानं कोरडी त्वचा हायड्रेट होते, बदाम तेलानं त्वचा दिवसभर मऊ राहते.
Yoga Asan: योगासनांनी होईल शरीर रिफ्रेश, जाणून घ्या आसन करण्याची पद्धत, फायदे
या तेलामुळे त्वचेवर चमक देखील येते. दररोज हे तेल लावल्यानं त्वचेला पोषक घटक मिळतात, ज्यामुळे त्वचा केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही निरोगी होते.
बदाम तेल कसं लावावं - बदाम तेल लावण्यापूर्वी, चेहरा पूर्णपणे धुवा. बदाम तेलाचे काही थेंब चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. सकाळी चेहरा धुतल्यावर तुम्हाला फरक जाणवेल. त्वचेप्रमाणेच केसांसाठीही बदामाचं तेल हा चांगला उपाय आहे.
