पुणे : जम्मू-काश्मीरचे पारंपारिक कपडे हे त्यांच्या भरत कामासाठी आणि वेगवेगळ्या डिझाईनसाठी प्रसिद्ध आहेत. हे कपडे लोकर, रेशीम किंवा सुती पासून बनवलेले असतात. आणि त्यावर सुंदर असं भरत काम केलेलं असतं. जम्मू-काश्मीरचे भरत काम केलेले कॉटन ड्रेसेस भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. आज आपण हेच ड्रेस मटेरियल पुण्यामध्ये कुठे मिळेल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
advertisement
कुठे कराल खरेदी?
पुण्यातील बालगंधर्व परिसरातील के के मार्केट या ठिकाणी तुम्हाला जम्मू-काश्मीरचे सुती असे कॉटनचे ड्रेस मटेरियल मिळतील. हे ड्रेस मटेरियल तुम्हाला ग्लॅमरस लुक देखील देतील. या कापडावरची बारीक आणि सुंदर डिझाईन तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. या ठिकाणी तुम्हाला रंगीबेरंगी तसेच पेस्टल कलरमध्ये हाताने भरत काम केलेले ड्रेस मटेरियल्स मिळतील. याची किंमत 800 पासून ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे.
लडाखची अँटिक ज्वेलरी आता मिळणार पुण्यात; फक्त 80 रुपयांपासून करा खरेदी Video
कश्मीरी कॉटन हे तुम्हाला अगदी डिसेंट लुक देतं. आणि या कारणामुळे स्त्रियांना या खरेदीचा मोह आवरता येत नाही. कश्मीरी कॉटन हे अस्सल असून उन्हापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण देखील करतात. यावरील भरतकाम हे हाताने विणलेले असल्याने ते अंगावर अगदी सुंदर दिसतात, अशी माहिती जम्मू-कश्मीरी व्यवसायीक सज्जात भट यांनी दिली आहे.
घरीच बनवले जातात आकर्षक दागिने, बंजारा महिलांची ज्वेलरी बनते कशी?
कश्मीरी कॉटन नेमकं कसं बनतं?
काश्मिरी शेळ्या, पश्मिना शेळ्या आणि शेळ्यांच्या इतर काही जातींच्या केसांपासून हे फॅब्रिक तयार केले जाते. शेकडो वर्षांपासून सूत, कापड आणि कपडे तयार करण्यासाठी याचा वापर केला जात आहे, अशी माहिती भट यांनी दिलीये.