डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आणि दिनचर्येत बदल करणं महत्त्वाचं आहे. बदाम तेल वापरणं, काकडी किंवा बटाट्याचा वापर, थंड दूध हे उपाय करुन पाहता येतील. तसंच काही सवयी बदलल्या तर काळ्या वर्तुळांचं प्रमाण कमी होणं शक्य आहे.
बदाम तेल - काळी वर्तुळं कमी करण्यासाठी बदाम तेलानं डोळ्यांखाली थोडं मालिश करा. बदाम तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे त्वचेचं चांगलं पोषण होतं. झोपण्यापूर्वी, डोळ्यांखाली बदाम तेलाचे दोन ते तीन थेंब लावा आणि हलक्या हातानं मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, सूज कमी होते. याच्या नियमित वापरामुळे काळी वर्तुळं आणि चेहऱ्यावरच्या बारीक रेषा कमी होतात.
advertisement
Face Pack : चेहऱ्यासाठी डाळिंबाचा रस वापरावा का ? डाळिंब फेसपॅक कसा तयार करायचा?
काकडी किंवा बटाट्याचा वापर - दुसरा उपाय म्हणजे थंड काकडी किंवा बटाट्याचे तुकडे लावणं. काकडीमुळे त्वचा थंड राहते आणि हायड्रेट करते. बटाट्यांमधे नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे रंगद्रव्य कमी करण्यास मदत होते. काकडी किंवा बटाटा डोळ्यांवर दहा मिनिटं राहू द्या आणि आराम करा. यामुळे काळी वर्तुळं कमी होतील तसंच, डोळ्यांचा थकवाही कमी होईल, जळजळ कमी होईल आणि डोळ्यांभोवती चमक दिसेल.
थंड दूध : काळी वर्तुळं कमी करण्यासाठी थंड दूध हा चांगला पर्याय आहे. दुधातील लॅक्टिक ॲसिडमुळे सौम्य एक्सफोलिएशन मिळतं आणि त्वचा मऊ आणि मॉइश्चराइझ राहते. हे करण्यासाठी, थंड दुधात कापसाचा गोळा भिजवा आणि डोळ्यांवर ठेवा. हे नियमितपणे केल्यानं चांगला आराम मिळू शकतो.
Knee Pain : गुडघे दुखणं कमी व्हावं यासाठी काय करावं? कोणते व्यायाम करणं योग्य ?
या गोष्टी महत्त्वाच्या :
घरगुती उपचारांसोबतच, जीवनशैली आणि आहार सुधारणं देखील महत्त्वाचं आहे.
दररोज 7-8 तास झोप घ्या.
भरपूर पाणी प्या.
हिरव्या भाज्या, डाळी, बीट असा लोह आणि बी12 युक्त आहार करा.
रात्रीचा स्क्रीन टाइम कमी करा आणि ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान करा.
