संशोधनात आढळलं काय ?
सकाळी लवकर नाश्ता करण्यापेक्षा 9 ते 12 या वेळेत नाश्ता केल्यानंतर रक्तातल्या साखेरच्या पातळीत सुधारणा दिसून आली. मात्र यासाठी नाश्ता केल्यानंतर 20 मिनिटं चालण्याची अट ठेवण्यात आली होती. जर तुम्ही आधी मॉर्निग वॉक करून आला असाल आणि मग नाश्ता केला तर तुमच्या रक्तातल्या साखरेत कोणताही बदल आढळून आला नाही. मात्र जर नाश्ता केल्यानंतर 20 मिनिटं चाललात तर साखरेचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलं.
advertisement
संशोधन कोणावर आणि कसं केलं ?
संशोधकांनी या काही लोकांचा समावेश केला ज्यांना टाईप 2 डायबिटीस होता. या लोकांची तीन गटात विभागणी केली. त्यांना 3 वेगवेगळ्या वेळी नाश्ता करण्यास सांगण्यात आलं. सकाळी 7 वाजता, सकाळी 9.30 वाजता आणि दुपारी 12वाजता. नाश्ता झाल्यानंतर त्यांना अर्ध्या ते 1 तासाने 20 मिनिटं चालण्यासाठी सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या रक्तातली साखर आणि ब्लडप्रेशरच्या नोंदी घेण्यात आल्या.
निकाल काय सांगतो ?
अभ्यासाच्या निकालांवरून असं दिसून आलं की न्याहारीची वेळ बदलल्याने रक्तातल्या साखरेवर परिणाम दिसून आला. ज्यांनी सकाळी नाश्ता केला त्यांच्या साखरेच्या पातळीत कोणताही बदल दिसून आला नाही. ज्यांनी दुपारी 12 वाजता नाश्ता केला त्यांची साखरेची पातळी 57 ने कमी झाली आणि ज्यांनी 9.30 च्या दरम्यान नाश्ता केला त्यांच्या साखरेच्या पातळीत 41ची घट झाली होती. रक्तातली साखर कमी झाल्याने महत्त्वाच्या अवयवांवर पडणारा दबावही कमी झाला होता.
जेवणाच्या वेळा बदलल्याचा सकारात्मक परिणाम डायबिटीसवर दिसून जरी आला असला तरीही यातली एक गोष्ट विसरता का नये ती म्हणजे या सगळ्या सहभागींनी खाल्ल्यानंतर 20 मिनिटं चालण्याचा व्यायाम केला होता. त्यामुळे तुम्हालाही डायबिटीस नियंत्रणात ठेवायचा असेल तर नियमित व्यायाम हा करावाच लागणार आहे.
डायबिटीस किंवा शुगर कंट्रोल करण्सायाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
