TRENDING:

Cholesterol : कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणं ओळखा, डोळ्यांमधे दिसणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या

Last Updated:

वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे हृदयाचं नाही तर डोळ्यांचंही नुकसान होऊ शकतं. कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं डोळ्यांमधेही दिसू शकतात. जाणून घ्या वाढलेल्या कोलेस्टेरॉलच्या लक्षणांबद्दल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल कोलेस्टेरॉलची समस्या वाढत्या प्रमाणात सामान्य झाली आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त वेळ बसून राहणे आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत आहे. बहुतेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण ही चूक भविष्यात धोकादायक ठरू शकते.
News18
News18
advertisement

वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे हृदयाचं नाही तर डोळ्यांचंही नुकसान होऊ शकतं. कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं डोळ्यांमधेही दिसू शकतात.

Heart Health: सेकंड हार्टची काळजी घेताय ना ? हृदयासाठी महत्त्वाच्या टिप्स

डोळ्यांभोवती सूज येणं - डोळ्यांभोवती सूज बराच काळ जाणवत असेल आणि ती कायम राहिली तर सावध व्हा. कारण हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्या.

advertisement

कॉर्नियावर पिवळ्या रंगाचे डाग - कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा कॉर्नियाच्या कडांभोवती पांढरा किंवा पिवळी रिंग तयार होऊ शकते. बऱ्याचदा हा डोळ्यांचा आजार समजतात, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं.

पिवळे डाग दिसणं - कधीकधी, पापण्यांवर किंवा डोळ्यांभोवती पिवळसर डाग दिसतात. हे पिवळे डागही वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं.

Hair Care: केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय - भृंगराज, या टिप्सचा होईल उपयोग

advertisement

डोळ्यांची जळजळ - डोळ्यांत जळजळ किंवा खाज येत असेल तर हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉल वाढत असताना, रक्तातील वाईट चरबी हळूहळू वाढत जातात. यामुळे डोळ्यांमधे जळजळ किंवा खाज येऊ शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हा काय प्रकार! चक्क उलट्या दिशेने धावू लागल्या रिक्षा, सांगलीत नेमकं काय घडलं?
सर्व पहा

उच्च कोलेस्ट्रॉलची इतर लक्षणं लक्षात ठेवा. थकवा जाणवणं, अस्वस्थ वाटणं, त्वचेवर पिवळ्या गुठळ्या येणं, हात आणि पायांवर सूज येणं, हात आणि पायांना थंडी वाजणं, छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, रक्तदाब वाढणं. यापैकी कोणतीही लक्षणं जाणवली तर डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्या.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cholesterol : कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणं ओळखा, डोळ्यांमधे दिसणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल