Hair Care : भृंगराजची पानं घेतील केसांची काळजी, जाणून घ्या कसा करायचा पानांचा वापर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
नैसर्गिक पद्धतीनं केसांची काळजी घेण्यासाठी भृंगराजची पानं वापरू शकता. आयुर्वेदात, भृंगराजला केसांचा राजा म्हणून ओळखलं जातं. केसांसाठी भृंगराज पानांचे काय फायदे आहेत आणि ते कसं वापरावं याविषयी आहारतज्ज्ञ श्रेया यांनी माहिती दिली आहे.
मुंबई : हिवाळ्यात त्वचेवर आणि केसांमधे कोरडेपणा जाणवतो. केस गळणं, कोरडेपणा, कोंडा अशा टाळूशी संबंधित समस्या वाढतात. यासाठी केसांसाठीची विविध तेल आणि उपचार उपलब्ध आहेत.
नैसर्गिक पद्धतीनं केसांची काळजी घेण्यासाठी भृंगराजची पानं वापरू शकता. आयुर्वेदात, भृंगराजला केसांचा राजा म्हणून ओळखलं जातं. केसांसाठी भृंगराज पानांचे काय फायदे आहेत आणि ते कसं वापरावं याविषयी आहारतज्ज्ञ श्रेया यांनी माहिती दिली आहे.
भृंगराजची पानं केसांसाठी एक चांगली औषधी वनस्पती आहेत. जाणून घेऊयात भृंगराजचे फायदे -
advertisement
केसांच्या वाढीला चालना - भृंगराज केसांच्या मुळांना उत्तेजित करते, ज्यामुळे नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते. ही पानं केसांच्या कूपांना मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणंही कमी होऊ शकतं.
नैसर्गिक रंग कायम राहतो - भृंगराजच्या पानांमुळे केसांचा नैसर्गिक रंग राखण्यास मदत होते. नियमित वापरामुळे केस काळे आणि चमकदार दिसतात.
टाळूला पोषण - टाळू कोरडी असेल, खाज येत असेल किंवा डोक्यातील कोंडा होण्याची शक्यता असेल तर भृंगराजमुळे याला आराम मिळू शकतो. यामुळे टाळू मॉइश्चरायझ होतो आणि वाढ चांगली होण्यास मदत होते.
advertisement
खराब झालेल्या केसांची दुरुस्ती - ड्रायर, स्ट्रेटनरच्या उष्णतेमुळे तसंच रसायनं आणि प्रदूषणामुळे कमकुवत झालेल्या केसांना पुनरुज्जीवित करण्यासाठी भृंगराज उपयुक्त आहे. ही पानं केसांच्या मुळांना मजबूत करतात.
सूज आणि जळजळ कमी होते - भृंगराजमधल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे टाळूला येणारी सूज आणि खाज कमी होते.
मुठभर ताजी भृंगराजची पानं घ्या. नीट धुवून बारीक करा. त्यात, थोडं पाणी किंवा खोबरेल तेल घालून पेस्ट बनवा.
advertisement
ही पेस्ट टाळू आणि केसांच्या मुळांना लावा. तीस-चाळीस मिनिटांनी सौम्य शाम्पूनं धुवा.
आठवड्यातून दोनदा केसांना भृंगराज तेल लावू शकता. हे करण्यासाठी, तेल थोडंसं गरम करा आणि बोटांनी टाळूवर पूर्णपणे मसाज करा. दोन-तीन तासांनंतर, केस शाम्पूनं धुवा.
भृंगराज ही एक स्वस्त, नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे. केसांच्या जवळजवळ प्रत्येक समस्येवर ही उपयोगी आहे.
advertisement
केस गळणं असो, कोंडा असो, केस पांढरे होणं असो किंवा कोरडे आणि ठिसूळ केस असो. भृंगराजच्या पानांच्या वापरामुळे केसांमधे, काही आठवड्यांतच फरक दिसून येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 6:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : भृंगराजची पानं घेतील केसांची काळजी, जाणून घ्या कसा करायचा पानांचा वापर


