Bigg Boss19: ग्रँड फिनालेआधी बिग बॉसचा गेम फिरणार! Pranit More च्या सपोर्टसाठी सेलिब्रिटींची झुंबड, दिग्गजांनी केला सपोर्ट!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Finale: सलमान खान होस्ट करत असलेला हा शो आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अशातच, अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.
मुंबई: टीव्हीवरील सर्वात मोठे रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा आता अवघ्या तीन दिवसांवर आला आहे! ७ डिसेंबर २०२५ रोजी या सिझनचा विजेता कोण होणार, याचा निकाल लागणार आहे. अमाल मलिक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि 'तिकीट टू फिनाले' विजेता गौरव खन्ना हे टॉप ५ फायनलिस्ट ट्रॉफीसाठी झुंज देत आहेत.
advertisement
advertisement
'बिग बॉस १८' फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने कॉमेडियन आणि टॉप ५ फायनलिस्ट प्रणित मोरे याला पाठिंबा दिला आहे. शिल्पाने X आणि तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत प्रणितच्या खेळाचे कौतुक केले आहे. तिने लिहिले, "ठीक आहे, मला माहीत आहे की प्रत्येकाचे आवडते स्पर्धक आहेत, पण माझ्यासाठी एकच निवड आहे - @Rj_pranit. मला प्रामाणिकपणे वाटते की, त्याने कधीही खोटा मुखवटा घातला नाही; तो नेहमीच खरा होता."
advertisement
advertisement
फक्त हिंदीतीलच नाही, तर 'बिग बॉस मराठी ३' चा विजेता विशाल निकम यानेही प्रणित मोरेला पाठिंबा देत मतदानाचे आवाहन केले आहे. प्रणित मोरेचा खेळ संतुलित आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा असल्यामुळे तो प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक ठरला आहे. विशाल निकमच्या या स्पष्ट पाठिंब्यामुळे दोन्ही शोच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


