Women Health : महिलांच्या आरोग्यासाठी मोलाच्या टिप्स, कॅल्शियम कमतरतेवर मात करायला होईल मदत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दूध पिणं हा कॅल्शियम कमतरता घालवण्यासाठीचा उपाय सांगितला जातो. पण फक्त दूध पिणं पुरेसं नाही. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं देखील महत्त्वाचं आहे. काही बिया कॅल्शियमच्या चांगल्या स्रोत आहेत आणि आहारात त्यांचा समावेश करणं खूप फायदेशीर ठरू शकतं.
मुंबई : महिलांमधे विशेषत: 30 वर्षांच्या वयानंतर कॅल्शियमची कमतरता जाणवायला सुरुवात होते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांधेदुखी, दातांच्या समस्या आणि स्नायू कमकुवत होणं अशा समस्या जाणवू शकतात. गर्भधारणेदरम्यान आणि रजोनिवृत्ती दरम्यान हा त्रास वाढू शकतो.
दूध पिणं हा कॅल्शियम कमतरता घालवण्यासाठीचा उपाय सांगितला जातो. पण फक्त दूध पिणं पुरेसं नाही. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं देखील महत्त्वाचं आहे. काही बिया कॅल्शियमच्या चांगल्या स्रोत आहेत आणि आहारात त्यांचा समावेश करणं खूप फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
जवस - जवसामधे भरपूर फायबर असतं. विशेषत: महिलांमध्ये हार्मोनल संतुलनासाठी ते फायदेशीर असतं.
शंभर ग्रॅम जवसामधे अंदाजे 255 मिलीग्राम कॅल्शियम असतं. जवस बारीक करून खाल्ल्यानं कॅल्शियमचं शोषण सुधारतं. रजोनिवृत्तीनंतर महिलांसाठी जवस अधिक फायदेशीर आहे.
तीळ - तीळ कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. केवळ शंभर ग्रॅम तीळांमधे अंदाजे 975 मिलीग्राम कॅल्शियम असतं. एक ग्लास दुधापेक्षा हे जास्त आहे. तीळातील जस्त घटक हाडांची घनता वाढवण्यासाठी मदत करतात.
advertisement
म्हणून, दररोज एक चमचा तीळ खाणं महिलांच्या हाडांना बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.
चिया सीड्स - चिया सीड्समधे ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात तसंच यात कॅल्शियम देखील असतात. शंभर ग्रॅम चिया सीड्समधे 631 मिलीग्राम कॅल्शियम असतं. या बियांमधे फॉस्फरस आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असतं,
चिया बिया पाण्यात भिजवून, स्मूदीमधे मिसळून किंवा दह्यासोबत खाऊ शकता.
advertisement
सूर्यफुलाच्या बिया - सूर्यफुलाच्या बियांमधे व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. हाडांच्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. शंभर ग्रॅम सूर्यफुलाच्या बियांमधे अंदाजे 78 मिलीग्राम कॅल्शियम असतं.
या बियांमुळे हाडांची घनता राखण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमधे जस्त, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा असतं. सुमारे शंभर ग्रॅम भोपळ्याच्या बियांमधे 46 मिलीग्राम कॅल्शियम असतं. झिंक हाडं तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी उपयुक्त आहे. महिलांमधे हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण जास्त असतं, ते रोखण्यासाठी देखील या बिया उपयुक्त आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 8:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : महिलांच्या आरोग्यासाठी मोलाच्या टिप्स, कॅल्शियम कमतरतेवर मात करायला होईल मदत


