Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करणं शक्य, वाचा हिवाळ्याचा डाएट प्लान कसा असावा ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हिवाळ्याच्या काळात शारीरिक हालचाल कमी होते आणि नकळत जास्त खाल्लं जातं. शिवाय, थंड हवामानामुळे घराबाहेर पडणं, चालणं आणि व्यायाम करणं कठीण होतं. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकतं. हिवाळ्यातही सहज वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी करणं शक्य आहे.
मुंबई : वजन कमी करणं हे आव्हानात्मक काम असतं. ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्यातून हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात वजन कमी करणं सोपं असतं. हिवाळ्यात बहुतेकांचं कमी झालेलं वजन परत वाढतं.
हिवाळ्याच्या काळात शारीरिक हालचाल कमी होते आणि नकळत जास्त खाल्लं जातं. शिवाय, थंड हवामानामुळे घराबाहेर पडणं, चालणं आणि व्यायाम करणं कठीण होतं. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकतं. हिवाळ्यातही सहज वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी करणं शक्य आहे.
advertisement
हिवाळ्यात वजन कसं कमी करावं - थंडीत बाहेर जाऊ शकत नसाल तर घरी काही व्यायाम करू शकता. थंडीमुळे बाहेर चालणं किंवा जॉगिंग करण्याऐवजी, घरी योगा किंवा इतर हलके व्यायाम करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे शरीर सक्रिय राहील आणि ताण कमी होईल.
योग्य अन्न - हिवाळ्यात, मसालेदार अन्नाची इच्छा होते. यामुळे भूक नसतानाही विविध प्रकारच्या अन्नाची इच्छा निर्माण होऊ शकते. वजन कमी करायचं असेल तर यावर नियंत्रण ठेवावं लागेल. तसंच, फळं, भाज्या, प्रथिनयुक्त मांस असे पोषक घटक असलेला संतुलित आहार घ्या.
advertisement
फायबर आणि प्रथिनयुक्त पदार्थ - वजन कमी करण्यासाठी, आहारात भरपूर फायबर आणि प्रथिनांचा समावेश करा. यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटेल आणि जास्त खाणं टाळता येईल.
भरपूर पाणी प्या - हिवाळ्यात गार हवेमुळे अनेकदा तहान लागत नाही. हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी हायड्रेटेड राहणं आवश्यक आहे. म्हणूनच, शरीर हायड्रेटेड आहे याची खात्री करणं महत्वाचं आहे. हायड्रेटेड राहिल्यानं कॅलरीज बर्न होण्यास मदत होते असं म्हणतात.
advertisement
याव्यतिरिक्त, हिवाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी, कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ शकता. हर्बल टी किंवा ग्रीन टी प्या आणि फळं आणि भाज्या जास्त खा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करणं शक्य, वाचा हिवाळ्याचा डाएट प्लान कसा असावा ?