हा कॅच नाही, चमत्कार आहे! मार्नस लाबुशेनने पकडला ऍशेस इतिहासातला Greatest Catch

Last Updated:

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्बेनमध्ये पिंक बॉल डे-नाईट टेस्ट मॅच सुरू आहे. या मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लाबुशेनने फिल्डिंगमध्ये चमत्कार केला आहे.

हा कॅच नाही, चमत्कार आहे! मार्नस लाबुशेनने पकडला ऍशेस इतिहासातला Greatest Catch
हा कॅच नाही, चमत्कार आहे! मार्नस लाबुशेनने पकडला ऍशेस इतिहासातला Greatest Catch
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्बेनमध्ये पिंक बॉल डे-नाईट टेस्ट मॅच सुरू आहे. या मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लाबुशेनने फिल्डिंगमध्ये चमत्कार केला आहे. लाबुशेनने पकडलेला हा कॅच ऍशेसच्या इतिहासातला सर्वोत्तम कॅच असल्याचं कौतुक ऑस्ट्रेलियन चाहते करत आहेत. लाबुशेनने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे.
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर ब्रेंडन डॉगेटला ही विकेट मिळाली असली तरी मार्नस लाबुशेनच्या कॅचचं सगळीकडे कौतुक होत आहे. डॉगेटने इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला त्रास देण्यासाठी शॉर्ट-पिच बॉल टकला. पहिल्या दिवसाच्या अखेरपासून आर्चर चांगला खेळत होता आणि त्याने इंग्लंडचा स्कोअर 300 रनच्या पुढे नेला. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आर्चरने पूल शॉट मारला, पण बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही. डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल जात असतानाच मार्नस लाबुशेन मिड विकेटवरून धावत आला आणि त्याने सुपरमॅनसारखी उजवीकडे उडी मारली आणि अविश्वसनीय कॅच पकडला.
advertisement

अॅशेसमधील सर्वोत्तम कॅच?

लाबुशेनने पकडलेला हा कॅच सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला. ऍशेसच्या इतिहासातला हा सर्वोत्तम कॅच असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत. तर काहींना लाबुशेनचा हा कॅच पाहून ग्लेन मॅकग्राने 2002 च्या ऍशेसमध्ये पकडलेल्या कॅचची आठवण झाली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मॅकग्राने ऍडलेडमध्ये पकडलेल्या मायकल वॉनच्या कॅचचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
advertisement

ऑस्ट्रेलियाला दिलासा

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच विकेटची गरज होती, कारण पहिल्या दिवसाच्या अखेरीस जोफ्रा आर्चरने ऑस्ट्रेलियन बॉलिंगवर आक्रमण केलं होतं. जोफ्रा आर्चरची विकेट मिळाल्यानंतर इंग्लंडचा 334 रनवर ऑलआऊट झाला. पिंक बॉल ऍशेस टेस्टमधला इंग्लंडचा पहिल्या इनिंगमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. जो रूटने ऑस्ट्रेलियन भूमीवर त्याचं पहिलं टेस्ट शतक ठोकलं. जो रूट 138 रनवर नाबाद राहिला, ज्यात त्याने 15 फोर आणि एक सिक्स मारली. रूटच्या शतकामुळे इंग्लंडला 300 रनचा टप्पा ओलांडला.
advertisement
दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 44 रनची आघाडी घेतली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 378/6 एवढा झाला आहे. जेक वेदरल्ड (72) आणि मार्नस लाबुशेन (65) यांनी अर्धशतकं केली, तर कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही 61 रनची खेळी केली. ट्रॅव्हिस हेड 33 रनवर आऊट झाला. कॅमरून ग्रीन 45 आणि जॉश इंग्लिस 23 रनवर माघारी परतले. दिवसाअखेरीस मायकल नेसर 15 रनवर आणि ऍलेक्स केरी 46 रनवर खेळत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हा कॅच नाही, चमत्कार आहे! मार्नस लाबुशेनने पकडला ऍशेस इतिहासातला Greatest Catch
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement