TRENDING:

Chia Seeds: हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी आणि मजबूत हाडांसाठी बेस्ट आहे ही इंग्रजी नावाच्या आयुर्वेदिक बिया

Last Updated:

Chia Seeds Benefits: हृदयापासून हाडांपर्यंत शरीराच्या आरोग्यासाठी हमखास आहारात हव्यात या बिया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आशीष त्यागी
चिया सीड्स
चिया सीड्स
advertisement

बागपत: चिया सीड्स (Chia Seeds) ही इंग्रजी नावाची अशी आयुर्वेदिक औषधी आहे, ज्याच्या नियमित सेवनाने शरीरावर आश्चर्यकारक फायदे होतात. वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि हाडे बळकट करण्यासाठी, चिया सीड्स खूप उपयुक्त ठरतात. या बिया शरीरातील सूज कमी करतात, त्वचेला चमकदार बनवतात आणि शरीराला मजबूती देताात.

चिया सीड्स म्हणजे काय? फायदे काय?

advertisement

सब्जा किंवा तुळशीच्या बियांसारख्या दिसणाऱ्या या काळपट छोट्या बिया असतात. पण सब्जापेक्षा थोड्या करड्या किंवा भुरकट रंगाच्या असतात. त्या सब्जाप्रमाणेच पाण्यात भिजवून किंवा द्ररवपदार्थात कालवून खायच्या असतात.

बागपतच्या आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. सुनीता सोनल धामा यांनी सांगितले की, चिया सीड्समध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड, प्रोटीन, फायबर, आणि अँटीऑक्सीडंट्स मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

advertisement

ब्लड शुगर नियंत्रण आणि हृदयाचं आरोग्य

चिया सीड्स रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि मधुमेहाच्या आजारांपासून शरीराचे रक्षण करतात. तसेच, चिया सीड्सचा आहारात समावेश केल्यानंतर हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हाडे मजबूत बनवतात. या बियांचा उपयोग पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील होतो.

कशा वापरायच्या बिया?

डॉ. सुनीता सोनल धामा यांनी सांगितले की, चिया सीड्सचे सेवन करणे अत्यंत सोपे आहे. तुम्ही या बिया भाज्यांमध्ये, सॅलडमध्ये, दूध किंवा पाण्यात मिसळून घेऊ शकता. कशाही स्वरूपात चिया सीड्स पोटात गेल्या तरी साइड इफेक्ट्स होत नाही. उलट शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

advertisement

Disclaimer: या लेखातील औषधं/आरोग्यविषयक सल्ला विशेषज्ञांशी चर्चा करून दिला आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतेही प्रयोग किंवा उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Chia Seeds: हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी आणि मजबूत हाडांसाठी बेस्ट आहे ही इंग्रजी नावाच्या आयुर्वेदिक बिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल