कप सिरपचे नमुने घेऊन त्याची चाचणी घेण्यात आली. तेव्हा कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) अशी रसायनं मिसळली जात असल्याचं समोर आलं. हे औद्योगिक सॉल्व्हेंट्स आहे, ते अँटीफ्रीझ, पेंट, ब्रेक फ्लुइड आणि प्लॅस्टिक काही घरगुती वस्तूंच्या निर्मितीमध्ये वापरली जातात. वापरले जातात. ते औषधनिर्माण उद्देशांसाठी नसतात. तरी हे स्वस्त आणि रंगहीन द्रव औषधात बेकायदेशीरपणे प्रोपिलीन ग्लायकॉलचा पर्याय म्हणून वापरलं जातं.
advertisement
Cough Syrup : कफ सिरफ नाही मग खोकला झाल्यावर मुलांना काय द्यायचं? डॉक्टरांनी सांगितला घरगुती उपाय
प्रोपिलीन ग्लायकॉल हे एक सॉल्व्हेंट आहे जे द्रव स्वरूपात औषधं विरघळण्यास मदत करते. प्रोपिलीन ग्लायकॉल नियंत्रित प्रमाणात सुरक्षित असलं तरी DEG आणि EG मानवांसाठी धोकादायक मानले गेले आहेत. अनेक अहवालांवरून असे दिसून येते की ही रसायने कमी प्रमाणात देखील गंभीर विषबाधा करू शकतात.
डायथिलीन ग्लायकॉल गिळल्यावर विषारी संयुगांमध्ये मोडतात, ज्यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेला गंभीर नुकसान होतं. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये मळमळ, पोटदुखी आणि लघवी कमी होणं अशी लक्षणं दिसतात. गंभीर प्रकरणांमध्ये ते वेगाने किडनी निकामी होण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे मृत्यू होतो.
कफ सिरफबाबत सरकारच्या सूचना
1) 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नयेत.
2) 5 वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
3) कफ आणि सर्दीवर प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आधार देणारे उपाय यांचा समावेश आहे.
4) औषधोपचार आवश्यक असल्यास, डॉक्टरांनी रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून आणि जवळच्या देखरेखीखाली औषधं द्यावीत.
5) डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस आणि उपचाराच्या कालावधीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. एकाच वेळी अनेक औषधे मिसळून देणे टाळावे, असेही निर्देश आहेत.