TRENDING:

Dental Care : पिवळे दात होतील स्वच्छ, घरी तयार करा नैसर्गिक दंतमंजन, दातांची काळजी घ्या

Last Updated:

दातांचा पिवळेपणा आणि मुख दुर्गंधी याबद्दल उपयुक्त माहिती. डॉक्टर झैदी यांनी यासाठी एक दंतमंजन सुचवलं आहे, यामुळे एकाच वेळी अनेक दंत समस्या सोडवणं शक्य आहे. हे दंतमंजन घरी सहज बनवता येतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दररोज दात घासल्यानंतरही दात पिवळे राहत असतील किंवा मुख दुर्गंधी असेल तर ही माहिती जरुर वाचा. या कारणांमुळे दात स्वच्छ झालेत असं वाटत नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात. काहीवेळा नैसर्गिक कारणं तर काहीवेळा अस्वच्छतेसारख्या चुकीच्या सवयी याला कारणीभूत असतात.
News18
News18
advertisement

दातांचा पिवळेपणा आणि मुख दुर्गंधी याबद्दल उपयुक्त माहिती. डॉक्टर झैदी यांनी यासाठी एक दंतमंजन सुचवलं आहे, यामुळे एकाच वेळी अनेक दंत समस्या सोडवणं शक्य आहे. हे दंतमंजन घरी सहज बनवता येतं.

Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठीच्या खास टिप्स, रोगांपासून होईल रक्षण

जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाची पानं, त्रिफळा, लवंग आणि सैंधव मीठ हे साहित्य यासाठी आवश्यक आहे. प्रथम, वाळलेल्या जांभळाच्या बिया धुवून वाळवा, हलक्या भाजून घ्या आणि नंतर बारीक वाटून घ्या. आवडत असेल तर जांभळाच्या बियांची पावडर देखील खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे, जांभळाची पानं वाळवून पावडर बनवा. या दोन्ही पावडर मिक्स करा. नंतर एक चमचा त्रिफळा पावडर, एक चमचा लवंग पावडर आणि एक चमचा खडे मीठ घाला. हे तयार झालेलं दंतमंजन काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

advertisement

जांभळाच्या बियांची पावडर - जांभळाच्या बियांमधे असलेले अँटीऑक्सिडंट्स बॅक्टेरियाची वाढ रोखतात आणि दात किडण्यापासून प्रतिबंध करतात.

जांभळाची पानं - जांभळाच्या पानांमधे असलेले नैसर्गिक अ‍ॅस्ट्रिंजंट्समुळे हिरड्या घट्ट होतात आणि रक्तस्त्राव कमी होतो.

त्रिफळा - त्रिफळामुळे थर जमा होण्याचं प्रमाण कमी होतं आणि हिरड्यांची सूज कमी होते.

Tanning: टॅनिंग रिमुव्हल फेसमास्क, जाणून घ्या टॅनिंग दूर करण्यासाठी सोपी युक्ती

advertisement

लवंग - लवंगांमधील युजेनॉलमुळे मुख दुर्गंधी आणि संवेदनशीलता कमी होते.

दगडी मीठ - दातांचा नैसर्गिक रंग कायम ठेवण्यासाठी आणि पिवळेपणा दूर करण्यासाठी हे मीठ उपयुक्त ठरतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मेहनत करण्याची तयारी पाहिजे! पिशव्या विक्रेते दीपक यांची प्रेरणादायी कहाणी
सर्व पहा

दररोज, हे दंतमंजन घ्या आणि बोटानं किंवा मऊ ब्रशनं दात आणि हिरड्यांवर हलक्या हातानं दोन मिनिटं मालिश करा आणि नंतर धुवा. या पावडरचा नियमित वापर केल्यानं सहा-आठ आठवड्यांत लक्षणीय परिणाम दिसू शकतात. त्यानंतर, आठवड्यातून दोन-तीन वेळा वापरणे पुरेसं आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dental Care : पिवळे दात होतील स्वच्छ, घरी तयार करा नैसर्गिक दंतमंजन, दातांची काळजी घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल