आजारी पडल्यावरच स्वतःकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा, खाण्यापिण्यापासून ते पाणी पिण्यापर्यंत सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर ही माहिती नक्की वाचा. किडनी स्टोन झाला तर पाणी पिण्याची आठवण होते. पाणी पिण्याचं महत्त्व कळतं. पण त्याआधी बहुतेक जण आधीच शरीराकडे लक्ष देत नाहीत.
किडनी स्टोन होण्याची कारणं अनेक आहेत, ज्यात आहारापासून ते पाण्याची कमतरता आणि दैनंदिन जीवनशैलीचा समावेश आहे. शरीरात कॅल्शियम, ऑक्सलेट किंवा युरिक एसिड सारख्या काही खनिजांचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतं तेव्हा ते मूत्रपिंडात जमा होतात आणि लहान कण तयार होतात, ज्यांना मूतखडे म्हटलं जातं.
advertisement
Migraine : मायग्रेन - सायनसच्या वेदनेवर उत्तर, या तेलांमुळे होईल त्रास कमी, वाचा वापरण्याची पद्धत
किडनी स्टोन किंवा मूतखडा झाला तर लघवी करताना जळजळ होणं, कंबर किंवा खालच्या ओटीपोटात तीव्र वेदना होणं, उलट्या होणं आणि वारंवार लघवी होणं यासारख्या समस्या उद्भवतात.
कोला आणि सोडा पेय - यात फॉस्फोरिक आम्ल आणि भरपूर साखर असते, ज्यामुळे मूत्रात कॅल्शियम आणि ऑक्सलेटचं प्रमाण वाढतं. यामुळे खडे तयार होण्याचा धोका वाढतो. ज्यांना आधी हा त्रास झाला आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात आधी कोणाला किडनी स्टोन झाले आहेत त्यांनी थंड पेय पिऊ नये.
जास्त दुग्धजन्य पदार्थ - चीज, पनीर इत्यादी - कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक असलं तरी, जास्त दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानं ते मूत्रात जमा होऊ शकतं आणि मूतखडे तयार होऊ शकतात. ज्यांच्या लघवीच्या चाचणीत कॅल्शियमचं प्रमाण जास्त दिसून येतं त्यांनी दुग्धजन्य पदार्थ मर्यादित ठेवावं.
चॉकलेट आणि कोको उत्पादनं - चॉकलेटमधे ऑक्सलेट देखील असतं आणि याचं प्रमाण जास्त असल्यानं ते मूत्रपिंडात जमा होऊन खडे तयार होऊ शकतात. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा ज्यांच्या मूत्रात ऑक्सलेटचं प्रमाण जास्त आहे त्यांनी मर्यादित प्रमाणात चॉकलेट खावं.
पालक आणि बीट - या दोन्ही भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, पण यात भरपूर ऑक्सलेट असतं. ज्यांना वारंवार मूतखड्याचा त्रास होतो किंवा ज्यांच्या मूत्रात ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असतं त्यांनी या भाज्या कमी प्रमाणात खाव्यात.
या गोष्टी लक्षात ठेवा:
दररोज दोन-तीन लीटर पाणी प्या.
मीठ आणि साखर मर्यादित खा.
लघवीची चाचण्या नियमित करा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानं आहार ठरवा.
किडनी स्टोन ही एक गंभीर पण टाळता येण्यासारखी समस्या आहे. या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि जीवनशैलीत काही बदल केले तर स्टोन टाळणं शक्य आहे. ज्यांना पूर्वी खडे झाले आहेत किंवा ज्यांच्या शरीरात या घटकांचं उत्पादन जास्त आहे त्यांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे.