Migraine : मायग्रेन - सायनसच्या वेदनेवर उत्तर, या तेलांमुळे होईल त्रास कमी, वाचा वापरण्याची पद्धत

Last Updated:

काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय मायग्रेन, सायनसचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तेल. पेपरमिंट ऑइल, लव्हेंडर ऑईल, निलगिरी ऑईल, लेमनग्रास ऑईल या तेलांमुळे वेदना कमी होते. मन शांत होतं आणि शरीराला आराम मिळतो.

News18
News18
मुंबई : डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास ज्यांना होतो त्यांनाच ती वेदना समजू शकते. मायग्रेनचा त्रास इतका असतो की डोकं फुटल्यासारखं वाटतं आणि सायनसमुळे नाक बंद होतं, डोकं जड होतं आणि डोळ्यांभोवती दाब येतो. औषधांमुळे आराम मिळतो, पण कधीकधी त्यांचा परिणाम कमी असतो किंवा दुष्परिणाम होऊ शकतात.
काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय मायग्रेन, सायनसचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तेल. पेपरमिंट ऑइल, लव्हेंडर ऑईल, निलगिरी ऑईल, लेमनग्रास ऑईल या तेलांमुळे वेदना कमी होते. मन शांत होतं आणि शरीराला आराम मिळतो.
advertisement
पेपरमिंट ऑइल
पेपरमिंट ऑइलमधे मेन्थॉल असतं, यामुळे नसा शांत होतात आणि मायग्रेनचा त्रास कमी होतो. नारळाच्या तेलात पेपरमिंट ऑइलचे एक किंवा दोन थेंब मिसळा आणि कपाळावर, कानाच्या कोपऱ्यांवर आणि मानेवर हलक्या हातानं मालिश करा. यामुळे तुम्हाला थंड वाटेल आणि डोकेदुखी हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
लव्हेंडर ऑईल
लव्हेंडर ऑईलमुळे ताण आणि चिंता कमी होते, ज्यामुळे मायग्रेनची तीव्रता कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात काही थेंब टाकून वाफ घ्या किंवा उशीवर एक थेंब टाका. यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल आणि वेदनांपासून आराम मिळेल.
advertisement
निलगिरी ऑईल
सायनसच्या समस्यांमधे हे तेल खूप प्रभावी आहे. यामुळे बंद नाक उघडतं आणि श्वास घेणं सोपं होतं. गरम पाण्यात चार - पाच थेंब घाला आणि वाफ श्वासानं घ्या. यामुळे बंद नाक उघडेल आणि डोक्यातील जडपणा कमी होईल.
advertisement
लेमनग्रास ऑईल
या तेलानं मायग्रेनला चालना देणारा ताण कमी होतो आणि मूड सुधारतो. डिफ्यूझरमध्ये वापरा किंवा हलक्या तेलात मिसळा आणि मानेवर आणि पाठीवर मालिश करा.
टी ट्री ऑईल - टी ट्री ऑईलमुळे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. यामुळे सायनस संसर्ग कमी करण्यास मदत होते. गरम पाण्यात काही थेंब घाला आणि वाफ घ्या किंवा तेलात टी ट्री ऑईल मिसळा आणि नाकाजवळ मालिश करा.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा:
ही तेलं थेट त्वचेवर लावू नका, नेहमी दुसऱ्या नेहमीच्या वापराच्या तेलात म्हणजेच नारळ किंवा बदाम तेलात मिसळून वापरा. कोणत्याही तेलाची अ‍ॅलर्जी असेल तर ते वापरू नका. गर्भवती महिला किंवा मुलांनी हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Migraine : मायग्रेन - सायनसच्या वेदनेवर उत्तर, या तेलांमुळे होईल त्रास कमी, वाचा वापरण्याची पद्धत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement