रात्रीचे नऊ वाजले होते. गोविंद बल्लभ पंत रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. मोहित गुप्ता यांनी त्यांच्या कॅथ लॅबचे काम जवळपास पूर्ण केलं होतं. तेवढ्यात त्यांना त्यांच्या कॅथलॅबबाहेर आवाज आला. डॉ. मोहित यांना काही समजण्याआधीच त्यांच्या कॅथ लॅबमध्ये 21 वर्षांच्या तरुणाला आणण्यात आलं. या तरुणाची ना नाडी होती, ना हृदयाचे ठोके आणि रक्तदाबही पूर्णपणे शांत होता. वैद्यकीय तपासणीत या तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं स्पष्ट झालं. या तरुणाच्या आयुष्याचा धागा तुटलाच होता. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, आता त्यांच्या हातात फक्त एकच गोष्ट उरली होती ती या तरुणाला वाचवणे. डॉ.मोहित गुप्ता आणि त्यांच्या टीमने आशा सोडली नाही. सीपीआरच्या माध्यमातून तरुणाला जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या क्रमाने, तरुणाला कृत्रिम आधार प्रणालीवर नेण्यात आलं आणि ऑपरेशन टेबलवर हलवण्यात आलं.
advertisement
ऑपरेशन सुरू झालं. डॉ मोहित यांनी त्या रुग्णाची छाती उघडली. त्यांची पहिली नजर हृदयावर पडताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तरुणाच्या हृदयाचे ठोके परत येऊ लागले होते. मोठ्या आशेने डॉक्टरांनी तरुणाची प्रत्येक धमनी पुन्हा उघडण्यास सुरुवात केली. असं करून डॉक्टरांच्या टीमने यशाच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकलं. आता हृदयाच्या ठोक्यांसह रक्तदाबही वाढू लागला होता. सुमारे तासभर सर्जरी चालली. काही क्षणात धोका टळला होता, पण तरीही तरुणाचा जीव सुरक्षित नव्हता. रुग्णाला प्रथम व्हेंटिलेटरवर आणि नंतर आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. काही तासांनंतर तरुण शुद्धीवर आला.
उंदीर चावला म्हणून तरुणीही उंदराला चावली; त्यानंतर तिची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले
आत्तापर्यंत सगळं ठीक होतं. यशस्वी ऑपरेशननंतरनंतरही डॉ. मोहित चिंतेत होते. त्यांच्या मनाला अजूनही एका विचित्र अस्वस्थतेनं घेरलं होतं. अवघ्या 21 व्या वर्षी या तरुणाला एवढा मोठा हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो हे त्यांना समजलं नाही. या तरुणाच्या लिपिड प्रोफाइल आणि सर्व चाचण्या पूर्णपणे ठीक आहेत, तो मधुमेही आणि धूम्रपान न करणारा आहे. मग असं का? अशा परिस्थितीत डॉ. मोहित यांची सर्वात मोठी कोंडी ही होती की, खरं कारण शोधून काढलं नाही, तर परिस्थिती कधीही पुन्हा येऊ शकते.
उत्तराच्या शोधात डॉ.मोहित यांनी पुढचं पाऊल उचललं. दुसऱ्या दिवशी फेरी सुरू असताना त्यांनी त्या तरुणाला त्याच्या कुटुंबीयांशी बोलायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याचे आई-वडील डॉ. मोहित यांना भेटायला आले. संवादादरम्यान हा तरुण विवाहित असून तो 4 महिन्यांच्या मुलीचा बाप असल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉ. मोहित यांनी त्याच्या पालकांना आपल्याला त्याच्या पत्नीशीच बोलायचं असल्याचं सांगितलं. तरुणाच्या पालकांनी त्यांच्याशीच बोलण्याचा आग्रह धरला, मात्र डॉ. मोहित यांनी ते मान्य केलं नाही. अखेर तरुणाच्या वडिलांनी त्या दोघांचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे, पुढील महिन्यात पूर्ण होईल, असं सांगितलं.
तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याचं गूढ उकलायला सुरुवात झाली होती.आता डॉक्टर मोहित यांना समजलं होतं की तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याचा संबंध त्याच्या पत्नीशी आहे. डॉ. मोहित यांनी तरुणाच्या आई-वडिलांना त्याच्या पत्नीला काहीही करून आणा, असं सांगितलं. डॉ. मोहित यांच्या सांगण्यावरून तरुणाची पत्नी त्यांना भेटायला आली. संवादादरम्यान त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद झाले आणि हे मतभेद घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं समजलं. अशा छोट्या गोष्टीही माणसाला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापर्यंत पोहोचवतात, याचं डॉ. मोहित यांना खूप आश्चर्य वाटलं.
डॉ.मोहित यांनी तरुणाच्या पत्नीला सांगितलं की, पुढचे तीन महिने तुझ्या पतीचा हात धरून दर मंगळवारी माझ्या ओपीडीत येशील. यावर तिनं उत्तर दिलं, सर, तुम्ही म्हणत असाल तर मी नक्की करेन. त्यानंतर पुढचे तीन महिने ती पतीचा हात धरून दर आठवड्याला डॉ. मोहित यांच्या ओपीडीत येत राहिली. या तीन महिन्यांत तरुणाच्या पत्नीच्या हाताने जे केलं ते जगातील कोणतंही औषध करू शकत नाही. आज चार वर्षे झाली, तो तरुण पूर्णपणे निरोगी आहे. दोघांनी स्वेच्छेने घटस्फोटाची कागदपत्रं मागे घेतली आहेत. आणि आता ते दोघंही आपल्या मुलीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.