गेली 35 वर्षे अनेक जण धडपडतायेत पण भल्याभल्यांनाही जमलं नाही; अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने ते करून दाखवलं, संपूर्ण जग आश्चर्यचकीत
- Published by:Priya Lad
Last Updated:
अवघ्या 13 वर्षांच्या मुलाचं टॅलेंट पाहून अनेक तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटतं आहे.
नवी दिल्ली : जगात टॅलेंटेड लोकांची कमी नाही. मोठी माणसंच नव्हे तर लहान मुलंही काही वेळा असं काही करून जातात जे अनेकदा मोठ्या माणसांनाही जमत नाही. असाच एक अवघ्या 13 वर्षांचा मुलगा. त्याने असं काही केलं, जे आजवर कुणालाच जमलं नाही. गेली 35 वर्षे अनेक लोक ही गोष्ट करण्यासाठी धडपडत होते. पण भल्याभल्यांना जमलं नाही ते या मुलाने करून दाखवलं. मुलाच्या या टॅलेंटमुळे संपूर्ण जग आश्चर्यचकीत झालं आहे.
अमेरिकेतील विलिस गिब्सनबद्दल चांगलाच चर्चेत आला आहे. तो असा गेम खेळला ज्याला गेमला गेली 35 वर्षे कुणी हरवू शकलं नाही. हा गेम आहे, टेट्रिस व्हिडीओ गेम. विलिस टेट्रिस व्हिडिओ गेमच्या किल स्क्रीनवर पोहोचला आहे. असं करणारा तो जगातील पहिला आहे.
advertisement
अमेरिकन न्यूज चॅनेलच्या माहितीनुसार, टेट्रिस व्हिडिओ गेम निन्टेन्डो एंटरटेनमेंट लिमिटेडने 6 जानेवारी 1989 रोजी लॉन्च केला होता. सोव्हिएत अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये काम करताना रशियन शास्त्रज्ञ अलेक्सी पाजीतनोव्ह यांनी हा गेम तयार केला होता. या खेळाबद्दल असं म्हटलं जातं की हा न संपणारा आहे. असं असताना विलिस या गेमच्या 157 व्या स्तरावर पोहोचला. हे आश्चर्यकारक आहे कारण गेम रिलीज झाल्यानंतर पहिल्यांदाच कोणता गेमर किल स्क्रीनवर पोहोचला आहे आणि हा पहिला गेमर विलिस आहे. विलिसच्या या कामगिरीने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
advertisement
जगभरात विलिस गिब्सनला ब्लू स्कॉटी म्हणून ओळखतात. या 13 वर्षाच्या मुलाने आपल्या प्रतिभेचा जागतिक विक्रम मोडला कारण इतक्या लहान वयात हा खेळ कोणीही क्रॅक केला नव्हता. रॉयटर्सशी बोलताना, क्लासिक टेट्रिस वर्ल्ड चॅम्पियनशिपचे सीईओ विन्स क्लेमेंटे म्हणाले की. "गेम निर्मात्यांनी कधीही विचार केला नाही की एखादी व्यक्ती गेममध्ये एवढी मजल मारेल. विलिस खरंच खूप हुशार मुलगा आहे"
advertisement
या मुलाने आपल्या बोटांवर खेळ अशा प्रकारे खेळला की तो अशा स्तरावर पोहोचला जिथं पोहोचता पोहोचता अनेकांना दम निघाला. या मुलाचा 40 मिनिटांचा व्हिडिओ 2 जानेवारी रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता.
Location :
Delhi
First Published :
January 05, 2024 2:34 PM IST
मराठी बातम्या/Viral/
गेली 35 वर्षे अनेक जण धडपडतायेत पण भल्याभल्यांनाही जमलं नाही; अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने ते करून दाखवलं, संपूर्ण जग आश्चर्यचकीत