उंदीर चावला म्हणून तरुणीही उंदराला चावली; त्यानंतर तिची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

Last Updated:

उंदीर चावल्यानंतर रागाच्या भरात तरुणीने जे केलं ते धक्कादायक आहे.

फोटो - प्रतीकात्मक
फोटो - प्रतीकात्मक
बीजिंग : उंदीर चावल्यावर तुम्ही काय कराल? एकतर आधी डॉक्टरकडे जाल आणि दुसरं म्हणजे घरातल्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न कराल. यासाठी वेगवेगळे उपाय कराल. पण चीनमधील एका तरुणीने तिला उंदीर चावल्यानंतर जे केलं ते धक्कादायक आहे. उंदीर चावल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी ही तरुणीसुद्धा त्या उंदराला चावली. त्यानंतर तिची अवस्था अशी झाली की पाहून डॉक्टरही हैराण झाले.
चीनमधील हे प्रकरण आहे. युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात राहणारी ही 18 वर्षांची तरुणी. तिच्या बोटाला उंदीर चावला. त्यानंतर तिला इतका राग आला की तिनं उंदराला पकडून बदला घेण्याचा ठरवला. यासाठी तिनं माऊसट्रॅप वगैरे लावला नाही तर तिनं त्याला स्वतःच पकडण्याचा निर्णय घेतला. तिनं उंदीर पकडलाही त्यानंतर ती त्याच्या डोक्यावर जोरात चावली. मुलीच्या दाताच्या खुणा उंदराच्या डोक्यावर उमटल्या. मुलीने त्या उंदराला इतकं घट्ट पकडलं होतं की गुदमरून त्याचा मृत्यू झाला.
advertisement
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया वापरकर्त्यांना धक्का देणारी ही घटना 21 डिसेंबर 2023 रोजी घडली.
विद्यापीठाच्या वसतिगृहात 18 वर्षांच्या मुलीला उंदराने चावा घेतला होता. यानंतर रागाच्या भरात त्यांनी हे प्रकरण स्वत:च्या हातात घेण्याचे ठरवले. माऊसट्रॅप वापरण्याऐवजी किंवा उंदराचा पाठलाग करण्याऐवजी, मुलीने स्वतःच तो पकडण्याचा निर्णय घेतला. यानंतर, त्याने कसा तरी उंदराला पकडले आणि नंतर त्याचे दात त्याच्या डोक्यावर चावले, त्यामुळे मुलीच्या दोन दातांच्या खुणा उंदराच्या डोक्यावर तयार झाल्या. मुलीच्या घट्ट पकडीमुळे गुदमरल्यामुळे उंदीर लवकरच मरण पावला.
advertisement
दरम्यान मुलीच्याही ओठांवर जखमा झाल्या. तरुणीच्या तिच्या Douyin अकाऊंटवर या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, तिच्या ओठावर दुखापत झाली. तिनं. ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन स्वतःवर उपचार केले. तिच्या रूममेटने असंही सांगितलं की, उपचारादरम्यान तिला आपला चेहरा दाखवण्यासही लाज वाटत होती.  तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला.
advertisement
तरुणीवर उफचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांनी यापूर्वी असं काही पाहिलं नव्हतं. तरुणी म्हणाली, "डॉक्टरांना तिची केस फाईल कशी लिहायची हे समजून घेण्यात थोडा वेळ लागला."
महिलेच्या या विचित्र कृतीने सगळेच अवाक् झाले. या घटनेची माहिती मिळताच सोशल मीडिया युझर्स आश्चर्यचकित झाले. काही युझर्सनी या घटनेनंतर तरुणीची खिल्ली उडवली. काही युझर्सनी तिला आपल्या घरी उंदीर पकडण्यासाठी बोलावलं. तर काही युझर्सनी तिचं कौतुक करत 2023 ची सर्वात साहसी महिला म्हणून घोषित केलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
उंदीर चावला म्हणून तरुणीही उंदराला चावली; त्यानंतर तिची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement