मिठी, किसनंतर...; मेट्रोमध्ये कपलनं आता हद्दच केली! घाणेरड्या कृत्याचा VIDEO VIRAL

Last Updated:

मेट्रोमधील कपलचं हे कृत्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

फोटो - सोशल मीडिया व्हि़डीओ ग्रॅब
फोटो - सोशल मीडिया व्हि़डीओ ग्रॅब
नवी दिल्ली : मेट्रोमध्ये कपलच्या विचित्र कृत्याचे आजवर बरेच व्हिडीओ समोर आले आहेत. कधी डान्स, कधी किस, कधी मिठी असे एक ना दोन कितीतरी व्हिडीओ आहेत, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि चर्चेत आले. पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात कपलने हद्द पार केली आहे. कपलने मेट्रोत जे केलं ते पाहून सर्वांचा संताप झाला आहे.
आजच्या डिजिटल युगात लोक पटकन प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करत असतात. दिल्ली मेट्रोने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने असंच काहीसं केलं की तुम्ही विचारही केला नसेल. त्यामुळेच हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.  व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कपल मेट्रोत बसलं आहे. त्यांच्या आजूबाजूला तसं कुणी प्रवासी दिसत नाही. पण समोर कुणीतरी त्यांचा व्हिडीओ काढतो आहे.
advertisement
तरुणीच्या हातात कोल्ड ड्रिंकची बाटली आणि तरुणाच्या हातात बुट आहे. तरुणी कोल्ड ड्रिंकची बाटली उघडून ती त्या बुटात ओतते आणि तरुण त्यात स्ट्रॉ टाकतो. नंतर दोघंही त्या बुटात ओतलेली कोल्डड्रिंक स्ट्रॉनं पिताना दिसतात. हा बूट तसा नवाही नाही. म्हणजे त्या तरुणाच्या पायातील आहे. त्याच्या एका पायात बूट आहे तर दुसऱ्या पायातील बूट हातात आहे, ज्यातून ते कोल्डड्रिंक पित आहेत.
advertisement
कपलचं हे कृत्य पाहून अनेकांना उलटी आली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.  काही युझरनी यांना पकडा आणि मारा असं म्हटलं आहेत तर  एका युझरने आता देवसुद्धा तरुण पिढीच्या या दिखाऊ वेडेपणासाठी काही करू शकत नाही, असं म्हटलं आहे.
advertisement
@SachinGuptaUP एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मिठी, किसनंतर...; मेट्रोमध्ये कपलनं आता हद्दच केली! घाणेरड्या कृत्याचा VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement