उष्णतेच्या लाटांमुळे होणारे आजार, कुपोषण आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील यामुळे वाढतात. त्यामुळे ही लक्षणे जाणवताच फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधणे गरजेचे आहे. रोजच्या होणाऱ्या बदलांचा विचार करता तेवढ्याच प्रमाणात काळजी घेणे महत्वाचे आहे. यामुळे सामान्यतः ताप, खोकला आणि सर्दी हे संसर्गजन्य आजार आज नॉर्मल जरी असले. तरी होणारा ताप हा आठवडाभर जास्त वेळ असेल तर ब्लड टेस्ट किंवा तापाची तपासणी तेवढ्याच प्रमाणात करून घेणे महत्वाचे आहे.
advertisement
यामुळे तापाची लक्षणे वगळता ते तेवढ्याच बारकाईने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत एकापासून दुसऱ्याला होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू, मलेरिया, झिका ताप, चिकनगुनिया आणि इबोला यांसारखे वेक्टर- जनित रोग हवामान बदलामुळे वाढतात. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी आणि बाहेरून येण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे. आजारावर महत्वाचा औषध म्हणजे पुरेशा प्रमाणात पाणी उकळवून पिणे जेणेकरून ताप झाल्यास पाण्याची कमतरता शरीरात कमी पडू नये. कधीकधी या बदलामुळे सकाळी व्यवस्थित दिसणारा माणूस रात्री तापाने फणफणतो आणि सकाळ झाली की तो त्याकडे दुर्लक्ष करतो.
असे न करता होणाऱ्या तापावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. कारण पेशी वाढणे आणि कमी होणे याचे प्रमाण ही वयाच्या 10 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत होताना दिसतात. त्यामुळे हे आजार शरीर साथ देत नसेल तर जीवघेणी ठरतात. त्यामुळे लक्षण कोणतेही असो वेळीच उपाय आणि योग्य औषध घेऊन गेलात तर त्याचा फायदा हा एक व्यक्तीमुळे पूर्ण कुटुंबाला होतो.त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबांची काळजी घ्या त्यात लहान मुले सहसा काय होतो हे सांगत नाही परंतु वातावरण बदल चालू असताना फॅमिली डॉक्टर कडे त्यांना चेकअप साठी नेणे भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.