TRENDING:

Stomach Gas Remedy : पोटात जास्त गॅस बनतोय? हे 3 अ‍ॅक्यूप्रेशर पॉईंट्स दाबा, काही मिनिटांत बाहेर पडेल गॅस

Last Updated:

Acupressure points to reduce stomach gases : गॅसेसचा त्रास तुम्ही काही मिनिटात कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला याची मुख्य कारणे आणि गॅस कमी करण्यासाठीचे काही सोपे अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्स सांगत आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पोट फुगणे, गॅसेस होणे ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या आहे. यात पोटात जडपणा, सूज, ताण किंवा फुलल्यासारखे वाटते. विशेषत: महिलांना मासिक पाळीच्या काळात हे अधिक जाणवते. परंतु जेव्हा पोटात गॅस तयार होतो, तेव्हा आपल्याला कोणतेही काम करणे अवघड जाते. कारण पोटात सतत काहीतरी त्रास होत असतो. मात्र गॅसेसचा त्रास तुम्ही काही मिनिटात कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला याची मुख्य कारणे आणि गॅस कमी करण्यासाठीचे काही सोपे अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्स सांगत आहोत.
गॅस बाहेर काढण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्स..
गॅस बाहेर काढण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्स..
advertisement

गॅस होण्याची कारणे..

- तणाव वाढला की पचन प्रक्रिया बिघडते. त्यामुळे गॅस, जडपणा आणि पोट फुगणे जाणवते. विश्रांती, व्यायाम आणि श्वसन तंत्रे यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो.

- मासिक पाळीपूर्वी किंवा दरम्यान शरीरात पाणी जास्त साठते. यामुळे पोट फुगते आणि हालचाल कमी झाल्याने जडपणा वाटू शकतो.

- जास्त मीठ, हार्मोनल बदल किंवा काही शारीरिक कारणांमुळे शरीरात पाणी साठते आणि पोट सूजल्यासारखे वाटते.

advertisement

- बीन्स, ब्रोकली, सोडा, जास्त तळलेले आणि लॅक्टोज असलेले पदार्थ पोटात गॅस वाढवतात. जास्त खाणे किंवा वेगाने खाणेही पोट फुगणे वाढवते.

शरीरात जास्त गॅस अडकल्यास जाणवतात या समस्या..

शरीरात जास्त गॅस अडकला तर अनेकांना पोटात जडपणा, पाठदुखी, छातीत दुखणे किंवा कधीकधी हृदयात दुखणे जाणवते. कधीकधी वेदना तीव्र असतात आणि ही समस्या गॅस आहे की हृदयाशी संबंधित समस्या हे सांगणे कठीण असते. नवभारत टाइम्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शरीरात काही प्रेशर पॉईंट्स असतात, जे दाबल्यावर काही मिनिटांत अडकलेला वायू बाहेर पडतो आणि आपल्याला आराम वाटू लागतो.

advertisement

गॅस बाहेर काढण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्स..

आपल्या शरीरात असे अनेक बिंदू आहेत जे दाबल्यावर, आपले पचन सुधारते आणि काही मिनिटांत अडकलेला वायू बाहेर पडतो. हे बिंदू दाबण्याचा योग्य मार्ग म्हणजे 20-30 सेकंदांसाठी तुमच्या अंगठ्याने हलका दाब द्या आणि नंतर सोडा. हे 5-6 वेळा करा. काही वेळाने, गॅस पोटातून खाली सरकू लागेल.

advertisement

नाभीभोवतीचा पॉईंट

हा बिंदू पोटाच्या मध्यभागी, नाभीच्या किंचित वर स्थित आहे. हा बिंदू हळूवारपणे दाबल्याने पोटाच्या नसा आराम मिळतात. यामुळे आपले पचन सक्रिय होते आणि पोटात अडकलेला गॅस हळूहळू खाली सरकू लागतो.

हाताच्या अंगठ्या आणि तर्जनीमधील पॉईंट

आपल्या अंगठ्या आणि तर्जनीमधील भाग हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट आहे. त्यावर थोडासा दाब दिल्याने पोटातील सूज कमी होते. शरीराची ऊर्जा संतुलित होते आणि पोटात अडकलेला गॅस लवकर अडकतो.

advertisement

पोटरीवरचा पॉईंट

पोटरीवरचा पॉइंट हा गुडघ्याच्या मागच्या बाजूस 4 इंच खाली स्थित असतो. तो दाबल्याने आपली पचनसंस्था देखील त्वरित सक्रिय होते आणि अडकलेला गॅस थोड्याच वेळात बाहेर पडतो. हा पॉईंट 1 मिनिट हलके दाबल्याने ढेकर येतो आणि वायू सहज बाहेर पडतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stomach Gas Remedy : पोटात जास्त गॅस बनतोय? हे 3 अ‍ॅक्यूप्रेशर पॉईंट्स दाबा, काही मिनिटांत बाहेर पडेल गॅस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल