डोळ्यांचे इन्फेक्शन झाल्यास आपल्याला काही सामान्य लक्षणे दिसतात. लालसरपणा, वेदना, पाण्यासारखा किंवा पू भरलेला स्त्राव आणि डोळ्यांमध्ये किरकोळ संवेदना यांचा यामध्ये समावेश आहे. काही व्यक्तींना अंधुक दृष्टी किंवा प्रकाश संवेदनशीलता देखील जाणवू शकते. पावसाळ्याच्या महिन्यांत सतर्क राहून आपण आपल्या डोळ्यांचे संरक्षण करू शकतो आणि डोळ्यांच्या इन्फेक्शनचा प्रसार रोखू शकतो.
डोळ्यांची स्वच्छता : पावसाळ्यात वातावरणात सतत ओलावा असतो. अशा परिस्थितीत डोळ्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी पाण्याने डोळे धुवावेत. यामुळे डोळ्यांमध्ये साचलेली घाण साफ होते.
advertisement
पुरेशी झोप : डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो. डोळे आपल्या शरीरापेक्षा जास्त सतत काम करतात, म्हणून त्यांना विश्रांती घेणे देखील महत्त्वाचे आहे.
धूळ आणि थंड हवा टाळा : डोळ्यांच्या संसर्गाचे एक प्रमुख कारण म्हणजे वातावरणात असलेले धुळीचे कण. ओलाव्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शक्य तितके धूळ कण, थंड हवा, धूर यापासून डोळ्यांचे संरक्षण करावे. घराबाहेर पडताना डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी चष्मा घालता येऊ शकतो.
डोळ्यांना विश्रांती घ्या : आजकाल बहुतेक लोकांना काही ना काही कारणास्तव संगणक किंवा मोबाईलवर तासनतास घालवावे लागतात. म्हणून मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर काम करताना डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी अधूनमधून ब्रेक घेणे महत्वाचे आहे.
कॉस्मॅटिक्स वापरणं टाळा : पावसाळ्यात डोळ्यांचे संक्रमण वेगाने पसरते. ही परिस्थिती टाळण्यासाठी शक्य तितके कमी सौंदर्यप्रसाधने वापरा. डोळ्यांचा मेकअप करताना, ब्रश, आयलाइनर आणि मस्कारा निर्जंतुक करायला विसरू नका. ते कोणासोबतही शेअर करू नका.
टॉवेल शेअर करू नका : घरात एकाच टॉवेलचा वापर करणे टाळा. यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. तुमचा टॉवेल कोणासोबतही शेअर करू नका. बॅक्टेरिया वैयक्तिक वस्तूंवर लवकर हल्ला करतात. म्हणून डोळ्यांचे संसर्ग टाळण्यासाठी तुमच्या वैयक्तिक वस्तू इतरांसोबत शेअर करू नका.
हात स्वच्छ करत राहा : पावसाळ्यात हात स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास, कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यानंतर हात धुवा. कारण हवेतील आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया वेगाने पसरतात. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. डोळ्यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा. यासोबतच डोळे चोळणे देखील टाळावे. यामुळे कॉर्नियाला नुकसान होऊ शकते.
पाण्यात डोळ्यांची काळजी घ्या : डोळ्यांना पाण्यातील संसर्गापासून वाचवणेही गरजेचे आहे. पूलमध्ये वॉटर-रेपेलेंट ग्लासेस घाला. यामुळे तुमचे डोळे संसर्गापासून वाचू शकतात. तसेच स्विमिंग पूलमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नका.