पुणे : दिवाळी म्हणजे प्रकाशमय करणारा सण. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या सणाची वाट पाहत असतो. हा सण आनंद, प्रकाश आणि समृद्धी घेऊन येणारा मानला जातो. दिवाळीला आकर्षक रोषणाईसोबतच खमंग खुशखुशीत फराळालाही महत्त्व असतं. अनेकजण दिवाळीत फटाकेही फोडतात. पण पर्यावरणाला हानीकारक फटाके फोडू नये, असं आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केलं जातं. आता फटाकेप्रमी फटाके फोडण्याऐवजी खाऊही शकणार आहेत. पुण्यातील मूर्तीज बेकरी यांनी बच्चे कंपनीसाठी चॉकलेटचे फटाके अन् फराळ तयार केलाय.
advertisement
पुण्यातील सोमवार पेठ इथे असलेली मूर्तीज बेकरी ही 88 वर्ष जुनी आहे. अनेक वर्ष झालं ते चॉकलेटचे फटाके तयार करतात. मागील 10 ते 15 वर्षांपासून ते चॉकलेटचे फटाके बनवत आहेत. आता मागच्या दोन तीन वर्षांमध्ये मागणी वाढली आहे. बाजारात ज्या आकाराचे फटाके मिळतात त्याच आकाराचे चॉकलेट फटाके इथे बनवले जातात. त्यामध्ये सुतळी बॉम्ब, पाऊस, लड, आकाश कंदील,चक्र, फुलबाज्या, रॉकेट, फ्लॉवर पॉट असे फटाके या ठिकाणी मिळतात.
30 वर्षानंतर राजयोग! 5 राशींचं भाग्य चमकणार, दिवाळीत माता लक्ष्मीची कृपा
15 दिवस खाता येणार फटाके
“आम्ही चॉकलेटमध्ये करंजी लाडू, शेव, चकली बनवतो. हे 15 दिवस राहू शकतं. तसंच ते गिफ्ट म्हणून ही देऊ शकतो. गिफ्ट पॅक मध्ये कॉम्बिनेशन करतो. काही गिफ्ट पॅकमध्ये चॉकलेट आहेत तर काही प्रमाणात चॉकलेटचे फटाके ही आहेत.एका गिफ्ट हॅम्पर मध्ये तीन प्रकार मिळतात. 10 प्रकारचे चॉकलेट फ्लेवर, 11 प्रकारचे चॉकलेट फटाके आणि 6 प्रकारचे फराळ मिळतो.
चॉकलेटच्या फटाक्यांत व्हरायटी
आकाश कंदील, लक्ष्मी बॉम्ब, चक्र, फुल बाजा, रॉकेट, फ्लॉवर पॉट, गोल बॉम्ब, लाड फटाका, चौकोनी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, छोटा बॉम्ब असे फटाके आहेत. तर चॉकलेट गिफ्ट बॉक्स, चॉकलेट फराळ ही आहेत. विशेष म्हणजे चॉकलेटचा किल्ला देखील तयार केला आहे. फटाके फोडल्या नंतर जो आनंद मिळतो तोच आनंद आता तुम्हाला हे फटाके खाल्यानंतर ही मिळणार आहे. 10 रुपये ते 20 रुपये मध्ये हे फटाके मिळतात, अशी माहिती मूर्तीज बेकरीचे मालक विक्रम मूर्ती यांनी दिली आहे.