TRENDING:

Famous Bakery Pune :100 वर्षांची गोड इराणी चवीची परंपरा, 30 प्रकारचे मिळतात पदार्थ, पुण्यातील प्रसिद्ध बेकरी माहितीये का?

Last Updated:

सिटी बेकरी ही एक ऐतिहासिक ओळख बनली आहे. तब्बल 100 वर्षांची परंपरा लाभलेली ही बेकरी आजही आपल्या खास इराणी चवीमुळे पुणेकरांच्या जिभेवर राज्य करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे शहर म्हटलं की येथे जुन्या परंपरा, संस्कृती आणि खाद्य वारसा यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. या शहरात अनेक दशकांपासून लोकांच्या चवीवर राज्य करणाऱ्या खाद्य ठिकाणांची परंपरा आजही कायम आहे. अशाच पुण्यातील एम.जी. रोड कॅम्प परिसरात असलेली सिटी बेकरी ही एक ऐतिहासिक ओळख बनली आहे. तब्बल 100 वर्षांची परंपरा लाभलेली ही बेकरी आजही आपल्या खास इराणी चवीमुळे पुणेकरांच्या जिभेवर राज्य करते.
advertisement

या बेकरीची सुरुवात इराणमधून आलेल्या सलामत इराणी यांच्या आजोबांनी केली. त्यांनी त्या काळात कॅम्प परिसरातील कोहिनूर हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम सुरू केले होते. काही काळानंतर ते हॉटेलचे पार्टनर झाले, मात्र त्यांना हॉटेल व्यवसायात फारसा रस नव्हता. म्हणूनच त्यांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच परिसरात सिटी बेकरीची स्थापना केली. आज सलामत इराणी आणि त्यांचा मुलगा हे या कौटुंबिक वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहेत.

advertisement

Famous Food In Mumbai : कॉर्न मॅगी ते चीज कॉर्न पास्ता, घरगुती चवीच उत्तम मुंबईतील ठिकाण, फक्त 39 रुपयांपासून घ्या आस्वाद

सिटी बेकरीत आज 20 ते 30 प्रकारचे विविध बेकरी पदार्थ तयार केले जातात. खारी, टोस्ट, श्रूजबरी, आले बिस्किट, नट बिस्किट, चोको चिप कुकीज, वाईन बिस्किट, चीज पापडी, चीज बोट्स, सॉफ्ट टोस्ट, लसूण टोस्ट आणि जिरा बटर अशा अनेक प्रकारच्या पदार्थांची येथे मोठी मागणी असते. पारशी पद्धतीची खास चव असलेली जिरा बिस्किटे आणि काजू बिस्किटे ही या बेकरीची खास ओळख ठरली आहेत.

advertisement

आमच्याकडे अनेक जुने ग्राहक आजही येतात. काही ग्राहक तर सांगतात की पूर्वी आम्ही दहा पैशांना ब्रेड घ्यायचो, आता तीच ब्रेड 40 रुपयांची झाली आहे. आमचे अनेक ग्राहक आज 80 ते 90 वर्षांचे आहेत, तरीही ते दर आठवड्याला आमच्या बेकरीत येतात, असं सलामत इराणी सांगतात.

कॅम्प परिसरातील या बेकरीला केवळ पुणेकरच नव्हे, तर बाहेरून येणारे पर्यटक देखील आवर्जून भेट देतात. जुन्या इराणी बेकरीचा तो मोहक सुगंध, बटरने खमंग झालेल्या खारी आणि गरम चहासोबत दिली जाणारी जिरा बिस्किट ही सिटी बेकरीची ओळख आहे.

advertisement

सिटी बेकरीच्या आतील वातावरणात आजही जुन्या काळाचा स्पर्श जाणवतो. लाकडी काउंटर, पारंपरिक ओव्हन, या सगळ्यामुळे ही बेकरी म्हणजे भूतकाळाची गोड सफर वाटते. आजच्या आधुनिक युगात जिथे अनेक नवी कॅफे आणि बेकरी उभ्या राहिल्या, तिथे सिटी बेकरीने आपल्या गुणवत्तेवर आणि परंपरेवर विश्वास ठेवून ग्राहकांचा विश्वास टिकवला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

सलामत इराणी म्हणतात, आम्ही कोणताही बदल न करता पारंपरिक रेसिपीचं पालन करतो. आमचं उद्दिष्ट चवीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आहे. 100 वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी आपली परंपरा जपणारी ही बेकरी आजही पुणेकरांसाठी फक्त खाद्यपदार्थ विकणारी जागा नाही, तर भावनांचा, आठवणींचा आणि गोड चवीचा ठेवा आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Famous Bakery Pune :100 वर्षांची गोड इराणी चवीची परंपरा, 30 प्रकारचे मिळतात पदार्थ, पुण्यातील प्रसिद्ध बेकरी माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल