छत्रपती संभाजीनगर : सध्या सर्वत्र कडाक्याचं ऊन पडतं, अशात काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते. बऱ्याचदा आपण ऊसाचा, लिंबाचा रस पितो. परंतु चहा, कॉफीला काही पर्याय नसतो. कोल्ड कॉफी आहे. परंतु तीसुद्धा परफेक्ट जमेल की नाही, याची काही गॅरंटी नसते. आज आपण सध्याच्या या तळपत्या उन्हात शरिराला गारवा मिळेल आणि आरोग्यही सुदृढ राहील अशी गारेगार ग्रीन आईस टी कशी बनवायची हे पाहणार आहोत. डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी या हेल्थी चहाची अगदी झटपट होईल अशी सोपी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
पाणी, कोणत्याही फ्लेव्हरची ग्रेन टी, संत्र किंवा मोसंबी, पुदिन्याची पानं, सब्जाच्या बिया, साखर आणि बर्फ, इत्यादी साहित्य घ्या. सर्वात आधी हे सर्व साहित्य एका भांड्यात घ्या. त्यात पाणी घालून व्यवस्थित उकळवा. गॅस बंद करून त्यात ग्रीन टी बॅग टाका.
गॅस बंद केल्या केल्या ही बॅग टाकल्यास चहाला चांगला फ्लेव्हर येतो. नंतर हे मिश्रण 15-20 मिनिटं फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या. एका ग्लासमध्ये संत्राच्या फोडी हाताने कृष्ण करून सालीसकट टाका. त्यामध्ये फ्रेश पुदिनाची पानं घालून मिश्रण क्रश करून घ्या.
त्यामध्ये भरपूर बर्फ घालून वरून सब्जाच्या बिया घाला. आता ग्रीन टीचं मिक्शर या ग्लासमध्ये ओतून छान एकजीव होऊद्या. जर तुम्हाला गोड हवं असेल तर त्यात आवडीनुसार साखर घाला. आता संत्र्याची फपद आणि पुदिन्याच्या पानांसह ग्रीन आईस टी सर्व्ह करा. यातून तुम्हाला गारवा मिळेलच पण आरोग्यही उत्तम राहील.