TRENDING:

Coffee Recipe Video : सुक्कू कॉफी! पण यात कॉफी नाही, कॉफीशिवाय कॉफी बनवायची कशी पाहा

Last Updated:

Sukku Coffee Recipe Video : आता कॉफीशिवाय कॉफी कशी काय बनवायची असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि याची रेसिपी पाहण्याचीही उत्सुकता असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कॉफी म्हणताच कॉफी लव्हर्सना कॉफी पिण्याची तलब झाली असेल. कॉफी एक पण ती बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने कॉफी बनवता येतात. कॉफीचे शॉप असतात जिथं तुम्हाला फिल्टर कॉफी, ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीची चव चाखायला मिळते. पण तुम्ही सुक्कू कॉफीबाबत कधी ऐकलं आहे का?
News18
News18
advertisement

सुक्कू कॉफी.... नावच जरा अजब वाटतं, हो की नाही? पण तुम्हाला आश्चर्य वाटेल नाव जरी सुक्कू कॉफी असलं तरी यात कॉफी नाही. हो बरोबर वाचलंत तुम्ही. सुक्कू कॉफी ही कॉफीशिवाय बनवलेली कॉफी आहे. आता कॉफीशिवाय कॉफी कशी काय बनवायची असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि याची रेसिपी पाहण्याचीही उत्सुकता असेल.

advertisement

Orange Recipe Video : संत्रीच नाही तर संत्र्याच्या सालीपासूनही बनते भन्नाट रेसिपी, संत्रा बर्फीइतकीच भारी

तर सुक्कू कॉफी बनवण्यासाठी आधी काय काय साहित्य लागतं ते पाहुयात

1/2 कप सुंठ किंवा सुंठ पावडर

1/4 कप धने

1/2 टेबलस्पून पांढरी मिरी

3-4 वेलची

दालचिनीचा एक तुकडा

1/2 टिस्पून जायफळ पूड

2-3 लवंग

advertisement

तुळस

साखर किंवा गूळ चवीनुसार

पाणी

दूध

सुक्कू कॉफी बनवण्यासाठी आधी तयार करूयात सुक्कू मसाला

सुक्कू मसाला कसा बनवायचा?

अख्खी सुंठ असेल तर सुंठ, धने, मिरी, वेलची, दालचिनी, लवंग सगळं पॅनवर हलके भाजून घ्या. यात जायफळ पूड टाकून त्याची मिक्सरमध्ये वाटून पावडर करून घ्या. हा सुक्कू मसाला तयार झाला. आता यापासून कॉफी कशी बनवायची ते पाहुयात.

advertisement

पाण्यात सुक्कू कॉफी कशी बनवायची?

एक कप पाणी घ्या, त्यात एक टिस्पून सुक्कू मल्ली पावडर आणि तुम्हाला आवडत असेल तर तुळशीची पानं टाकून 2 मिनिटं उकळा. गाळून घ्या आणि गरमगरम प्या. तुम्हाला हवं तर तुम्ही यात साखर किंवा गूळ चवीसाठी टाकू शकता.

दुधात सुक्कू कॉफी कशी बनवायची?

अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध म्हणजे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं. आत एक टिस्पून सुक्कू मल्ली पावडर आणि चवीनुसार साखर टाका. 2 मिनिटं उकळा, गाळून, गरमागरम प्या.

advertisement

Pohe Recipe Video : दररोज कांदेपोहे खाऊन कंटाळलात, आता पोह्यांवर बेसन टाकून पाहा

व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार अशा पद्धतीची कॉफी तामिळनाडूमध्ये बनवली जाते. एक साऊथ इंडियन रेसिपी. दररोज तीच कॉफी, तोच चहा पिऊन कंटाळा आला असेल तर ही सुक्कू कॉफी ट्राय करायला हरकत नाही. यात मसाले असल्याने हिवाळ्यात काही गरमागरम प्यायची इच्छा झाली तर चहा-कॉफीला पर्याय म्हणून ही सुक्कू कॉफी एकदम बेस्ट आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

bhojan.kutuhalam इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला सुक्कू कॉफीबाबत माहिती होतं का? तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नाहीतर एकदा सुक्कू कॉफी बनवून पिऊन पाहा आणि कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Coffee Recipe Video : सुक्कू कॉफी! पण यात कॉफी नाही, कॉफीशिवाय कॉफी बनवायची कशी पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल