ठाणे : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एक विशेष खाद्यसंस्कृती आहे. प्रत्येक भागाची चव अनोखी आहे. त्या-त्या पदार्थासाठी तो-तो परिसर ओळखला जातो. कोकणाचा विचार केला असता कोकणात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्यासाठी घावणे बनवले जातात. पण तांदळाचे घावणे बनवणे हे सोपे काम नाही.
पिठाचा आणि पाण्याचा अंदाज चुकला तर घावणे खराब होतात. त्यामुळे कोकणात बनवले जाणारे हे घावणे नेमके कसा तयार करतात आणि झटपट तयार करण्याची नेमकी रेसिपी तरी काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
घावणे बनवण्यासाठी लागणारे साहित्य - एक वाटी तांदळाचे पीठ, थोडं पाणी, चवीपुरतं मीठ, पीठ मिक्स करण्यासाठी पातेले, थोडं तेल.
पुण्यातील या गावाला म्हटलं जातं गौराईचं माहेरघर, नेमकं काय आहे यामागचं कारण?, VIDEO
कृती - सर्वप्रथम तांदळाच्या पिठात चवीपुरते मीठ टाकून पाणी घालून मिक्स करून घ्यावे. थोडेसे पातळ पीठ झाले की व्यवस्थित त्याला मिक्स करून गॅस सुरू करून त्यावर घावण्याचा तवा ठेवावा. तवा तापला की त्यावर थोडे तेल घालून, पातळ पाण्यासारखे झालेले पिठाचे पाणी गोलाकार ओतून घ्यावे. जाडसर करू नये. पातळ घावणे केल्यामुळे ते लवकर आणि व्यवस्थित शिजतात.
Ganeshotsav Nashik : नाशिकच्या बाजारात दाखल झाली लाल मातीची मूर्ती, दरही परवडणारे, फायदेही आहेत अनेक
घावणे तव्यावर टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे. तसेच दोन मिनिटे वाफ द्यावी. वाफ दिल्यानंतर हळूहळू तव्यावरचा घावणे पलटून घ्यावा आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भावन शिजवून घ्यावा. यानंतर तुमचे घावणे तयार होईल.
तर अशा पद्धतीने तुम्ही गरमागरम आणि झटपटीत घावणे करू शकता. हे घावणे तुम्ही चहा सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता.