अशाप्रकारे बनवा ज्यूस
सर्वप्रथम सर्व संत्री स्वच्छ धुवून घ्या. आपण लिंबूचे दोन भाग करतो त्याप्रमाणे संत्री चाकूने 2 भागात कापून घ्या. आता लिंबू पिळतात तसेच संत्री एका भांड्यात पिळून घ्या. आता या ज्यूस मध्ये थोडं पाणी ऍड करून घ्या आणि गाळणीने गाळून घ्या. त्यानंतर त्यात चवीप्रमाणे साखर आणि मीठ ऍड करून ग्लास मध्ये सर्व्ह करा. 2 मिनिटांत संत्र्याचा ज्यूस तयार होईल, असं काकडे सांगतात.
advertisement
सर्दी, खोकलाच नाहीतर हृदयरोगही होईल गायब, हा प्राणायाम करून तर पाहा
हे आहेत फायदे
हिवाळ्यात दररोज एक संत्री खाल्ल्याने तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी सारखे आवश्यक पोषक घटक मिळतात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी आणि तापापासून संरक्षण होते. कोरड्या हिवाळ्यात संत्र्यांपासून हायड्रेशनमुळे तुमच्या त्वचेलाही फायदा होतो. घरी आजारी व्यक्ती असल्यास ही ट्रिक वापरून झटपट ज्युस करून देऊ शकता. तुम्ही प्रवासात असताना सुद्धा हा ज्यूस तयार करू शकता. तर 2 मिनिटात संत्र्याचा ज्यूस तयार करण्याची सांगितलेली आयडिया नक्कीच फायदेशीर ठरेल.