संत्र्याच्या सालीचा तसा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे. संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर बनवून काही जण दात घासण्यासाठी किंवा सौंदर्यात त्याचा वापर करतात. पण संत्र्याच्या सालीपासून पदार्थही बनवता येतो, याचा कुणी विचारही केला नसेल. नेमका हा पदार्थ काय आहे त्याची संपूर्ण कृती आता आपण पाहुयात.
Pohe Recipe Video : दररोज कांदेपोहे खाऊन कंटाळलात, आता पोह्यांवर बेसन टाकून पाहा
advertisement
संत्र्याची साल स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. एका कढईत फोडणीला टाकतो तितकं तेल गरम करा. त्यात चिरलेल्या संत्र्याच्या साली टाकून 5-7 मिनिटं परतून घ्या. जेणेकरून तेल आत जाईल. 5 मिनिटांनंतर याचा खूप छान सुगंध येईल. आता हे काढून घ्या.
त्याच कढईत फोडणीइतकंच तेल गरम करा. त्यात एक टेबलस्पून चणा डाळ, एक टेबलस्पून उडीद डाळ, एक टीस्पून मेथी, एक टेबलस्पून धने, आता बेडगी मिरची, कढीपत्ता, एक वाटी खोबरं असं लागोपाठ टाकून एकएक करून परतून घ्या.
आता गॅसवर एक पातेलं ठेवा त्यात तांब्याभर पाणी घ्या. यात थोडी मिरची, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता कुस्करून टाका. उकळी आली की यात संत्र्याच्या तेलात परतलेल्या साली टाका. थोड्याशा संत्र्याच्या साली बाजूला काढून ठेवा. आता वर जे भाजलेलं जिन्नस होतं, त्यात या बाजूला काढलेल्या संत्र्याच्या साली टाकून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्या.
Matar Recipe Video : मटार पनीर-मटार फ्लॉवर, काय तेच तेच खाणार; ट्राय करा मटारची नवी रेसिपी
आता संत्र्याच्या साली ज्या भांड्यात टाकल्यात त्याला उकळी आली असेल तर त्यात एक वाटी चिंचेचा कोळ आणि तुम्हाला जितकं गोड आवडतं त्यानुसार गूळ टाका. गूळ पूर्ण वितळलं की यात तयार केलेली संत्र्याची साल आणि मसाल्याची पेस्ट टाका. थोडं किंचित पाणी टाका मीठ टाकून चांगली उकळी येऊ द्या. जितकं हे उकळे तितकी त्याची चव चांगली लागेल. शेवटी तुम्ही यात हवं तर खोबरेल ते टाकू शकता. ही संत्र्याच्या सालीची मुडूली एक साऊथ इंडियन डिश आहे. करीचा हा एक प्रकार आहे.
Mrs Bhagavath युट्युब चॅनेलवर याचा रेसिपी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तुम्ही एकदा करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
