TRENDING:

काकडी कडू का लागते? तुम्ही विकत घेताना 1 साधी चूक करता

Last Updated:

काकडीत प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतं. तसंच पाण्याचं प्रमाण 96% असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
सर्वात महत्त्वाची असते काकडीची साल.
सर्वात महत्त्वाची असते काकडीची साल.
advertisement

झांसी : उन्हाळ्यात बाजारात रसाळ फळांना विशेष मागणी असते. या काळात काकडीची मागणीही प्रचंड वाढते. लोक भरपूर प्रमाणात काकडी खातात. काकडी त्वचा आणि पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्यात विविध पोषक तत्त्व असतात. शिवाय काकडी फॅट फ्री असल्यामुळे ती कितीही खाल्ल्यास वजन वाढत नाही.

काकडीत प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतं. तसंच पाण्याचं प्रमाण 96% असतं. त्यामुळे शरीर व्यवस्थित हायड्रेटेड राहतं. परंतु काही काकडी चवीला कडवट असतात. असं का? काकडी विकत घेताना आपल्याकडून काही चूक होत असेल का?

advertisement

हेही वाचा : कैरीची आंबटगोड अन् चटपटीत रेसिपी, घरीच बनवा वर्षभर टिकणारा गुळांबा

डॉ. संतोष पाण्डेय सांगतात की, काकडी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची असते काकडीची साल. जर या सालीचा रंग हलका पिवळसर असेल तर काकडी ताजी असते. ती चवीला कडवट लागत नाही. शिवाय आकाराने जास्त मोठी आणि जाड काकडी खरेदी करू नये. त्यात बिया भरपूर असतात त्यामुळे ती कडू लागू शकते.

advertisement

कडवटपणा कसा दूर करावा?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडी कधीही पातळ खरेदी करावी. ती जरा मऊ असायला हवी. जास्त कडक काकडी खरेदी करू नये. घरी आणल्यानंतर काकडीचा मागचा भाग कापा आणि त्याबाजूला मीठ लावून काकडी खा, त्यामुळे काकडी कडू लागणार नाही.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा 

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
काकडी कडू का लागते? तुम्ही विकत घेताना 1 साधी चूक करता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल