कुठे मिळतोय पिझ्झा?
मुंबईतील घाटकोपरच्या प्रसिद्ध अशा खाऊ गल्ली परिसरात अनेक वेगवेगळे स्ट्रीट फूड पदार्थ मिळतात. या ठिकाणी एक नव्हे तर अनेक पदार्थांचा खवय्ये आस्वाद घेतात. खाऊ गल्लीतील केतकी कुल्हड पिझ्झा नामक स्टॉलवर कुल्हडमध्ये पिझ्झा मिळत आहे. या स्टॉलचे मालक संजीव मुखीया आहेत. ते या ठिकाणी कुल्हड पिझ्झा विकत आहेत. 100 रुपयात मिळणाऱ्या या कुल्हड पिझ्झाला खाण्यासाठी खवय्यांची मोठी पसंदी मिळत आहे.
advertisement
आता ठाण्यात खा चिकन कात्सू जापनीज पदार्थ; पाहा बनतो कसा Video
कसा बनतो कुल्हड पिझ्झा?
आजवर पिझ्झा हा प्रकार आपण गोलाकार ब्रेडवर सर्व होताना बघितले आहे. परंतु घाटकोपरच्या खाऊ गल्लीतील या स्टॉलवर पिझ्झा हा प्रकार मातीच्या कपात म्हणजेच कुल्हडमध्ये सर्व केला जातो. हा पिझ्झा तयार करण्याची पद्धत अगदी नॉर्मल पिझ्झा तयार करण्यासारखेच आहे. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पिझ्झा पास्ता सॉस घेतला जातो.
कुनाफाचे 10 प्रकार एकाच ठिकाणी; ‘इथं’ घ्या अरेबिक मिठाईचा आस्वाद
त्यात पिझ्झा ब्रेडचे बारीक चौकोनी काप टाकले जातात. त्याचप्रमाणे बारीक चिरलेल्या भाज्या म्हणजे शिमला मिरची, कांदा, कॉर्न लसूण पेस्ट, पिझ्झा सॉस, चीज, चाट मसाला, ओरिगानो आणि चिली फ्लेक्स शेवटी पनीर टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतले जाते. सर्व मिश्रण एका मातीचा कपात घेऊन त्यावर शेवटी मोझरेला चीज लावून ते एका कोळशाच्या भट्टीत दहा मिनिटे गरम केले जाते. तयार गरम कुल्हड पिझ्झा खवय्यांना सर्व्ह केला जातो, असं संजीव मुखीया यांनी सांगितले.