ठाणे : सध्या सर्वत्र अत्यंत उत्साहात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव म्हटल्यावर लाडक्या गणरायासाठी दररोज प्रसादाच वाटप केले जाते. त्यात रोज सकाळी - संध्याकाळी प्रसादाला काय बनवायचा हा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही.
गणेशोत्सवात कोकणात अनेक ठिकाणी प्रसादासाठी लापशी बनवली जाते. तुम्हीसुद्धा हा पदार्थ प्रसादासाठी तयार करू शकतात. पण नेमका हा पदार्थ कसा तयार केला जातो, याची रेसिपी काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
लापशी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
पाव किलो लापशी, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी दुध, अर्धा वाटी तूप, अर्धा वाटी डालडा, एक वाटी साखर, गरम पाणी आणि थोडी वेलची पावडर.
गणेशोत्सवात गावी जात आहात, पण ट्रॅव्हल्सचे दर पाहिलेत का, संपूर्ण आकेडवारी
कृती - सर्वप्रथम लापशी व्यवस्थित भाजून घ्या. ही लापशी थोडी लालसर झाली की वेगळी काढून घ्या. आता टोपात तूप आणि डालडा टाकून त्यात लापशी पुन्हा भाजून घ्या. त्यानंतर त्यात गरम पाणी घालून मिक्स करा. मग त्यात शेंगदाणे, साखर, वेलची पूड आणि मीठ घालून एकत्र करुन घ्या.
थोडावेळ झाकण ठेऊन लापशी ला वाफ द्या. लापशी मधील पाणी कमी झाल्या नंतर गॅस बंद करा. अशा पद्धतीने प्रसादाची लापशी तयार झालेली आहे. ही लापशी तुम्ही गणेशाला नैवेद्य ठेऊ शकतात आणि प्रसादासाठी सर्वांना वाटप करू शकतात.