Pune Ganeshotsav : ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनाला, आरती केल्यावर व्यक्त केल्या मनातील भावना, VIDEO

Last Updated:

पुणे शहरात सध्या सगळीकडे गणपतीची धामधूम पाहायला मिळते आहे. कोल्हापूरचा स्वप्निल कुसाळे याने पुण्याच्या गणेशोत्सवात सहभागी होऊन भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेत आरती केली. 

+
ऑलिम्पिकवीर

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनाला

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट'चे बाप्पा शनिवारी मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 'वरद विघ्नेश्वर वाड्यात' विराजमान झाले. मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या उत्सवात दररोज बाप्पाच्या चरणी अनेक जण नतमस्तक होत असतात. अशातच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे यानेदेखील गणेशोत्सवात पुण्यात भेट देऊन भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती केली.
advertisement
पुणे शहरात सध्या सगळीकडे गणपतीची धामधूम पाहायला मिळते आहे. अनेक दिग्गज कलावंत, खेळाडू बापाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. तसेच वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी देखील देत आहेत. त्यातच कोल्हापूरचा स्वप्निल कुसाळे यानेही पुण्याच्या गणेशोत्सवात सहभागी होऊन भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेत आरती केली.
advertisement
यावेळी माध्यमांशी बोलताना स्वप्नील याने म्हटले की, जेव्हाही मी बापाच्या दर्शनासाठी त्याच्यासमोर जातो, तेव्हा मी त्याला काही मागत नाही. फक्त त्याला एकटक पाहत बसतो. मागील काही वर्ष मी स्पर्धेच्या तयारी मध्ये असल्याने मला गणेशोत्सवामध्ये सहभागी होता आले नाही. मात्र, यावर्षी मी ठरवले की, या वेळेचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार आणि याच कारणाने मी पुण्यात यायचे ठरवले, असे त्याने सांगितले.
advertisement
Ganeshotsav Pune : तुळशीबाग मंडळाचा उपक्रम, यंदाच्या वर्षी तयार केला जगन्नाथ पुरीचा देखावा, VIDEO
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे यंदाचे 133 वे वर्ष असून भारतातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची सर्वदूर ख्याती आहे. गणेशोत्सवाच्या काळात या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेक सामाजिक उपक्रम देखील मंडळाच्या वतीने राबवले जातात. या मंडळाला ऐतिहासिक वारसा असल्याने राज्यभरातुन येणारे भाविक या मंडळाला आवर्जून भेट देतात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganeshotsav : ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनाला, आरती केल्यावर व्यक्त केल्या मनातील भावना, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement