RBI Jobs : तरुणांनो लक्ष द्या! परीक्षा न देता थे RBI मध्ये नोकरी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या
Last Updated:
RBI Recruitment 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कोणतीही परीक्षा न देता नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. लेटरल रिक्रूटमेंटद्वारे 93 ग्रेड C पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून अंतिम तारीख 6 जानेवारी 2025 आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट नोकरी मिळवण्याचा मार्ग RBI ने खुला केला असून लेटरल रिक्रूटमेंट अंतर्गत विविध तांत्रिक आणि तज्ज्ञ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ उमेदवारांना थेट नियुक्ती देण्याची ही प्रक्रिया आहे.
RBI कडून डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर, आयटी सिक्युरिटी एक्स्पर्ट, आयटी सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्ट मॅनेजर, रिस्क अकाउंट, क्रेडिट रिस्क स्पेशलिस्ट अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या क्षेत्रात शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
अर्ज प्रक्रिया समजून घ्या...?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीद्वारे एकूण 93 पदे भरली जाणार आहेत. ही भरती ग्रेड ‘C’ स्तरावरील पदांसाठी असून पूर्णवेळ कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे.
advertisement
पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. डेटा सायंटिस्ट पदासाठी स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स, गणित, डेटा सायन्स, फायनान्स या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई.,बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स) आवश्यक आहे तसेच किमान 4 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. डेटा इंजिनियर पदासाठी बी.ई.,बी.एस्सी.,एम.एस्सी.,एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एमसीए पदवी आवश्यक आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा किमान 25 ते कमाल 60 वर्षांपर्यंत आहे. उमेदवारांची निवड प्रायमरी स्क्रिनिंग, शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
RBI Jobs : तरुणांनो लक्ष द्या! परीक्षा न देता थे RBI मध्ये नोकरी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या








