रहमान डकैतचा फिव्हर! यामी गौतमही पडली प्रेमात, म्हणाली,"विनर ऑफ ट्रेंड" VIDEO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dhurandhar Song Dance : मुलगी झाल्याच्या आनंदात 'धुरंधर' या चित्रपटातील 'FA9LA' या गाण्यावर एका वडिलांनी डान्स केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Dhurandhar : मुलगा असो वा मुलगी दोघांचाही जन्म हा आनंदाचा उत्सवच असतो. पण लक्ष्मी घरी आल्याचा आनंद काही निराळाच असतो. नुकतंच मुलगी झाल्याच्या आनंदात रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या 'धुरंधर' या चित्रपटातील 'FA9LA' या गाण्यावर एका वडिलांनी डान्स केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 'धुरंधर' या चित्रपटाची देशभर चांगलीच क्रेझ आहे. 280 कोटी रुपयांच्या बजेटच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या 14 दिवसांत देशभरात 460 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट आणि यातील गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. चक्क मुलगी झाल्याच्या आनंदातही रुग्णालयात एक वडिल या चित्रपटातील गाण्यावर थिरकले आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी, अभिनेत्री यामी गौतमने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
लेकीच्या जन्माचा वडिलांना आनंद
व्हायरल व्हिडीओमध्ये, एक महिला डान्स करत नवजात बाळाला रुग्णालयातील वॉर्डमधून बाहेर आणते. तिच्या चेहऱ्यावर लक्ष्मीच्या आगमणाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. तसेच आसपासदेखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महिला जशी रूममधून बाहेर येते तसं डाव्या बाजूने मुलीचे वडील 'धुरंधर' चित्रपटाच्या 'FA9LA' गाण्यावर अक्षय खन्नाच्या स्टेप्स करत लेकीचं स्वागत करताना दिसतात. डान्स करत करत तो व्यक्ती जेव्हा आपल्या मुलीला कुशीत घेतो, तेव्हा भावनांना आवर घालत स्वतःला सावरतो. 19 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नेटकरी त्या वडील आणि मुलीवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
advertisement
यामी गौतमची खास कमेंट
धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी यामी गौतमने हा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. यामी गौतमने लिहिलं आहे," Hands down, winner” म्हणजेच "निःसंशय, हाच खरा विजेता. विनर ऑफ द ट्रेंड". आतापर्यंत हा व्हिडीओ 6.5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, 17 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्सही आहेत.
advertisement
Hands down, winner 🙏🏻❤️ https://t.co/24M9fEfbyN
— Yami Gautam Dhar (@yamigautam) December 17, 2025
नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
view commentsनेटकरी कमेंट करत वडिलांचे अभिनंदन करत आहेत. आज सकाळी मी पाहिलेली हीच सर्वात सुंदर पोस्ट आहे. त्यांची डान्स करतानाची स्माइल अप्रतिम आहे, हे म्युझिक आता टॉपवर आहे, देव बाळाला आशीर्वाद देवो, हे खरंच ट्रेंडचे विनर आहेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 12:01 PM IST











