Ishan Kishan : 'मला खूप वाईट वाटलं...', 2 वर्षानंतर अखेर मनातलं ओठांवर, टीम इंडियातून वगळल्यावर काय म्हणाला ईशान किशन?

Last Updated:

Ishan Kishan break silence on Team India : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमधील विजयानंतर स्पोर्ट्सस्टारशी बोलताना इशान किशनने आपल्या संघनिवडीबाबतच्या वेदना व्यक्त केल्या.

Ishan Kishan break silence on Team India
Ishan Kishan break silence on Team India
Ishan Kishan On Drop From Team India : डोमेस्टिक क्रिकेटच्या मैदानात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये झारखंडच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत जेतेपदावर नाव कोरलं आहे. हरियाणाविरुद्ध झालेल्या या निर्णायक मॅचमध्ये केवळ बॅटिंगच नाही, तर उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर इशान किशन याने आपल्या टीमला पहिल्यांदाच चॅम्पियन बनवलं असून, या विजयानंतर त्याने टीम इंडियातील पुनरागमनाबाबत मोठं विधान केलं आहे. या विजयामुळे झारखंडच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरलं गेलं आहे.

सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज

इशान किशन याने फायनलमध्ये केवळ 49 बॉल्समध्ये 101 रन्सची तुफानी सेंच्युरी झळकावली. त्याच्या या वादळी खेळीमुळे झारखंडने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 262 रन्सचा हिमालय उभा केला होता. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हरियाणाची टीम 193 रन्सवर गारद झाली आणि झारखंडने 69 रन्सने ही मॅच जिंकली. या संपूर्ण स्पर्धेत 10 डावात 517 रन्स करून इशान सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज ठरला आहे.
advertisement

खूप वाईट वाटले होते, मात्र...

या विजयानंतर स्पोर्ट्सस्टारशी बोलताना इशान किशनने आपल्या संघनिवडीबाबतच्या वेदना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, जेव्हा चांगली कामगिरी करूनही टीम इंडियात निवड झाली नाही, तेव्हा खूप वाईट वाटले होते. मात्र, आता मी त्या मानसिकतेतून बाहेर आलो असून, मला स्वतःला अजून सिद्ध करायचं आहे, असंही इशान किशन यावेळी म्हणाला.
advertisement

मी स्वतःला सांगितले की जर...

दरम्यान, मी स्वतःला सांगितले की जर या कामगिरीनंतर माझी निवड झाली नाही, तर कदाचित मला आणखी काही करावे लागेल, कदाचित मला माझ्या संघाला जिंकण्यास मदत करावी लागेल, असं इशान किशन म्हणाला. नोव्हेंबर 2023 पासून तो भारतीय संघाबाहेर आहे, पण या धडाकेबाज कामगिरीनंतर आता पुनरागमनाचे मार्ग मोकळे झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ishan Kishan : 'मला खूप वाईट वाटलं...', 2 वर्षानंतर अखेर मनातलं ओठांवर, टीम इंडियातून वगळल्यावर काय म्हणाला ईशान किशन?
Next Article
advertisement
BMC Election : ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थेट पत्र
‘BMC ELECTION IS NOT…’ वरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे
  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

View All
advertisement