Mumbai News : बापरे! गॅस बिल भरताना वयोवृद्ध व्यक्तीला बसला मोठा धक्का; क्षणात खातं रिकामं
Last Updated:
Cyber Crime : गॅस बिल भरण्याच्या बनावट मेसेजद्वारे वांद्रे येथील 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची एक लाखांहून अधिक रकमेची सायबर फसवणूक झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुंबई : मुंबईत सायबर भामट्यांचा सुळसुळाट वाढत असतानाच ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. वांद्रे येथील कलानगर परिसरात राहणाऱ्या 84 वर्षीय सुधीर परुळेकर यांना गॅस बिलाच्या नावाखाली तब्बल 1 लाख 19 हजार 40 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
त्या दिवसी परुळेकरांसोबत काय घडलं?
परुळेकर यांच्या मोबाईलवर महानगर गॅसचे थकीत बिल भरण्याबाबत एक मेसेज आला. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना बिल भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं वाटलं, मात्र काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळवण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ बँक आणि पोलिसांकडे धाव घेतली.
advertisement
या प्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात 16 डिसेंबर रोजी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
घटनांमध्ये होत आहे वाढ!
view commentsसायबर गुन्हेगार नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विशेषतहा गॅस, वीज, मोबाईल बिल यातून गैरफायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी मेसेजमधील लिंकवर क्लिक न करण्याचे आणि कोणतीही आर्थिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : बापरे! गॅस बिल भरताना वयोवृद्ध व्यक्तीला बसला मोठा धक्का; क्षणात खातं रिकामं











