TRENDING:

33 वर्षांची परंपरा, तिच चव, तोच वडापाव, कल्याणमधील सगळ्यात फेमस ठिकाण

Last Updated:

गेल्या 33 वर्षांपासून हा वडापाव अजूनही त्यांची वडापावची चव टिकवून आहे. इथे मिळणारी हिरवी चटणी आजही खवय्यांची मन जिंकून घेते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

ठाणे : कल्याण आणि वडापाव यांचं नातं फार जुने आहे. कल्याणमध्ये असे अनेक वडापाव आहेत जिथे वर्षानुवर्ष कल्याणकर आवर्जून हमखास जातातच. कल्याण स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणारा आधारवाडी येथील नरू वडापाव कल्याणमध्ये खूप प्रसिद्ध आहे. गेल्या 33 वर्षांपासून हा वडापाव अजूनही त्यांची वडापावची चव टिकवून आहे. इथे मिळणारी हिरवी चटणी आजही खवय्यांची मन जिंकून घेते. गेले 33 वर्ष हा वडापाव कल्याण फेमस वडापाव आहे. पूर्वी इथे फक्त वडा मिळायचा, परंतु आता वडापाव सुद्धा मिळू लागला आहे. यांची चटणी आणि वड्याची भाजी यासाठी अनेक जण लांबून येथे खायला येतात.

advertisement

नरेश यांनी 1992 साली सुरू केलेल्या नरेश वडापाव सेंटरला आता नरू वडापाव म्हणून सुद्धा ओळखले जाते. नरेश ढोणे यांनी 1992 ला नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय असावा या उद्देशाने नरू वडापावला सुरुवात केली. सुरुवातीला ते दीड रुपयाला एक वडापाव विकायचे. लॉकडाऊनच्या आधीपर्यंत हे सगळे वडे चुलीवर तळले जायचे परंतु लॉकडाऊन नंतर आता हे गॅसवर बनवले जातात.

advertisement

घरगुती चटणीची टेस्टच बेस्ट, ठाण्यात इथं फक्त 20 रुपयांपासून मिळतंय चायनिज

उत्तम चविष्ट अशा बटाट्याच्या भाजीने बनलेला गरमागरम वडा आणि त्यासोबत इथे मिळणारा पाव आणि हिरव्या चटणीने कल्याणकरांचं मन कधीच जिंकलय. कितीही वडापाव सोबतच पॅटीस, बटाटा भजी, मिरची भजी असे सगळे पदार्थ मिळतात तरीसुद्धा, आजही अनेक जण वडापाव मिळत असला तरीही आवर्जून दोन ते तीन नुसता वडा खातात. 33 वर्ष तीच चव टिकवून ठेवणं खरंतर खूप कठीण असतं, पण नरू वडापाव यांनी मात्र आजही त्यांच्या वड्याची चव आणि त्यासोबतच वडा बनवण्याची पद्धत तशीच कायम ठेवली आहे. आणि यांच्या आपुलकी आणि प्रेमामुळे कल्याणकर आवर्जून इथे वडापाव खाण्यासाठी येतात.

advertisement

'नरेश ढोणे माझे काका आहेत. पूर्वी काका आणि माझे वडील हे व्यवसाय चालवायचे. परंतु आता फार गर्दी होते आणि त्यांच्या वयानुसार त्यांना फार काम करायला जमत नाही, म्हणूनच मी हा व्यवसाय पुढे चालवायचा निर्णय घेतला. माझे सुद्धा ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे परंतु इतरांच्या हाताखाली नोकरी असण्यापेक्षा आपलाच चालू असलेला व्यवसाय पुढे घेऊन जाण्याचा माझा मानस आहे.' असे जयेश ढोणे यांनी सांगितले.

advertisement

मग मंडळी वाट कसली पाहताय, तुम्ही सुद्धा वडापाव लवर असाल तर कल्याण मधील आधारवाडी संभाजीनगरमध्ये टॉप फाईव्हमध्ये असणाऱ्या या नरू वडापावला नक्की भेट द्या आणि हा चविष्ट आणि चटपटीत वडापाव ट्राय करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
33 वर्षांची परंपरा, तिच चव, तोच वडापाव, कल्याणमधील सगळ्यात फेमस ठिकाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल