घरगुती चटणीची टेस्टच बेस्ट, ठाण्यात इथं फक्त 20 रुपयांपासून मिळतंय चायनिज
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Thane Famous Food: ठाण्यातील महेंद्र आणि त्याची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून स्वत:चा व्यवसाय करण्याचं त्यांचं नियोजन होतं. त्यांनी चायनिज स्टॉल सुरू केला आहे.
advertisement
advertisement
ठाण्यातील महेंद्र आणि त्याची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून स्वत:चा व्यवसाय करण्याचं त्यांचं नियोजन होतं. त्यांनी चायनिज स्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला. चटाक चायनिज असं नाव त्यांनी आपल्या व्यवसायाला दिलं. याठिकाणी चायनीज चिली, राईस असे पदार्थ फक्त 40 रुपयांपासून मिळतात. इथं हायजिन सुद्धा मेंटेन करत असल्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सकाळी 11 वाजल्यापासूनच गर्दी होते.
advertisement
advertisement
इथे मिळणाऱ्या फ्रँकीची सुद्धा खूप क्रेज आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 15 हून अधिक प्रकार खायला मिळतील. ज्यामध्ये व्हेज फ्रँकी, व्हेज मयोनीज चीज फ्रँकी, व्हेज नूडल्स मायोनीज असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. खास कॉलेजच्या मुलांसाठी म्हणून स्वस्तात चांगले पदार्थ मिळावे हाच उद्देश असल्याचं महेंद्र सांगतो.
advertisement
advertisement









