मुंबई : बर्गर म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. बर्गर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. त्यामुळे मुंबईतील विविध कॅफे आणि फूड ट्रकवर बर्गर खायला मिळतो. यामध्ये तुम्ही साधा टिक्की बर्गर खाऊन कंटाळले असाल तर मुंबईतील विक्रोळीच्या एका युनिक अशा फूड ट्रकवर चक्क न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गर मिळत आहे. या ठिकाणी खवय्ये आवडीने न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गरचा आस्वाद घेत असतात.
advertisement
मुंबईतील विक्रोळीच्या गोदरेज ट्रिकसाईड कॉलनी परिसरात असलेले टीओ नामक हा फूड ट्रक विविध स्नॅक्स प्रकार या ठिकाणी विकत आहे. सुदीप आणि चिराग हे दोन हॉटेल मॅनेजमेंट झालेले मित्र मिळून हा एक फूड ट्रक चालवत आहेत. लहानपणापासून चविष्ट पदार्थ तयार करण्याची आवड दोघांनाही होती. हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर कुठल्या हॉटेलमध्ये काम न करता त्यांनी स्वतःचाच एक फूड ट्रक सुरू केला आहे. ते विविध स्नॅक्स प्रकारसोबत येथे न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गर विकतात. यांची किंमत 120 रुपये आहे.
पतीचे झाले निधन पण त्या खचल्या नाही; वडापाव विकणाऱ्या महिलेचा संघर्ष ऐकून पाणावतील तुमचे डोळे
न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गर कसा बनवतात?
अगदी न्यूयॉर्कच्या पद्धतीचा हा बर्गर तुम्ही घरी देखील तयार करू शकता. याची रेसिपी आणि पद्धत अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम चिकन खिम्याची एक टिक्की तयार करून घ्यावी. या खिम्यात आपले रोजचे मसाले घालून त्याला गोल टिक्कीचा आकार द्यायचा. बर्गरचे बनपाव ग्रील मशीन वर ठेवून टोस्ट करून घ्यावी. बर्गर तयार करताना सर्वप्रथम बनपावचा शेवटचा लेयर घ्यावा.
Famous Food : नाश्त्यासाठी घरीच बनवा ‘हा’ फेमस गुजराती पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल
त्यावर आईसबर्ग लेटेस्चे पान घ्यावे. त्यावर एक खाप टोमॅटो घेऊन त्यावर घरी तयार केलेले लसणाचे म्हणजेच गार्लिक मेयोनीज घालावी. पाचव्या लेयरमध्ये तयार केलेली चिकन पॅटी घेऊन त्यावर चीज स्लाईस घ्यावी. चीज स्लाईसवर ऑरेंज सॉस टाकून बनपावची वरची बाजू ठेवून बर्गर तयार करणे. अतिशय सोपा असा चिकन स्मॅश बर्गर तयार झाल्यानंतर तो टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावा, अशी माहिती या फूड ट्रकचे मालक चिराग साठे यांनी दिली आहे.