TRENDING:

उन्हाळ्यातला बेस्ट बिझनेस, आजोबा सहा महिन्यात कमावतात 5 लाख रुपये, काय आहे फॉर्म्युला? Video

Last Updated:

गेले 30 वर्षांपासून शिवा भास्कर हे मठ्ठा विकतात. सिद्धेश्वर पेठ जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्ह्यातून येणारे सर्वच व्यक्ती त्यांचा मठ्ठा पिल्याशिवाय जात नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

सोलापूर : उन्हाळा सुरू झाला असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोलापुरात कमाल तापमान 39 अंशांवर गेले आहे. सर्वच ठिकाणी शहरात शीतपेयांची दुकाने थाटात उभी राहत आहेत. सोलापूरकरांना उन्हाळा म्हटलं की आठवतो तो म्हणजे शिवाचा मठ्ठा. गेले 30 वर्षांपासून शिवा भास्कर हे मठ्ठा विकतात. सिद्धेश्वर पेठ जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्ह्यातून येणारे सर्वच व्यक्ती त्यांचा मठ्ठा पिल्याशिवाय जात नाहीत.

advertisement

शिवा भास्कर जाधव गेल्या 30 वर्षांपासून मठ्ठा विक्रीचा व्यवसाय करत आहे. हा मठ्ठा स्वतः बनवत आहे. जानेवारी पासून सुरू झालेले मठ्ठा विक्री ही 7 जूनला थांबते. दिवसाला शिवा भास्कर यांच्याकडे दिवसाला 5 ते 10 कॅन मठ्ठा हा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये विकला जातो. क्वालिटीमध्ये कोणतीही आजपर्यंत तफावत केली नाही त्यामुळेच मी या धंद्यात टिकून आहे, असं शिवा भास्कर सांगतात.

advertisement

गृहिणी झाली उद्योजक! गावातच सुरू केली दालमिल, 4 महिन्यात लाखोंची कमाई

मठ्ठा बनवण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये पर्यंतचा खर्च शिवा जाधव यांना येतो तर मठ्ठा विक्रीतून सर्व खर्च वजा करून दिवसाला 3 ते 5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तर सहा महिन्यात मठ्ठा विक्रीतून शिवा जाधव हे 4 ते 5 लाख रुपयांची कमाई करतात.

advertisement

पूर्वी 8 आण्यांना किंमत असणाऱ्या मठ्ठ्याची आज 15 रुपये इतकी किंमत आहे. अत्यंत उत्तम क्वालिटीचा हा मठ्ठा शहरात सर्वच नागरिकांना भुरळ घालतो. यामध्येची स्पेशॅलिटी म्हणजे इतर मठ्ठ्यावाल्यांपेक्षा शिवा हे स्वतः दूध आणून ते दूध फोडतात आणि तयार झालेल्या दह्यापासून ते लसूण, अद्रक, पुदिना आणि काळे मीठ घालून स्वतः तयार करतात. एका कॅनमध्ये मसाल्याचे किती प्रमाण असावे याचा अंदाज त्यांना 30 वर्षांपासून आहे. एकदा मठ्ठा पिलात की दिवसभर आपल्याला भूक लागत नाही. शिवाय सायकल वरून सुरू झालेला हा प्रवास आजही सायकलीवरच आहे. वय 75 वर्ष असताना 30 वर्ष या मठ्ठा बनवण्याच्या प्रक्रियेत घालवली आहेत, असंही शिवा भास्कर सांगतात.

advertisement

सोलापूर हे धन दांडग्या श्रीमंतांचे तसेच श्रमिकांचे शहर म्हणून सुरुवातीपासून ओळख आहे. भर उन्हात कामगार एक 15 रुपयाचे दाल चावल आणि एक मठ्ठा पिला की दिवसभर त्यांचे भूक आणि तहान भागते आणि त्यांच्या हाताला बळ येते ते देखील कामगार आज शिवाचा मठ्ठा आवर्जून पितात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
उन्हाळ्यातला बेस्ट बिझनेस, आजोबा सहा महिन्यात कमावतात 5 लाख रुपये, काय आहे फॉर्म्युला? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल