ठाणे : सध्या अनेकजण बर्थडे पार्टीसाठी किंवा आपला संध्याकाळचा वेळ शांततेत घालवण्यासाठी कॅफेच्या शोधात असतात. अनेकांना असा कॅफे हवा असतो जिथे त्यांना मानसिक शांतता मिळेल. कल्याणमध्ये सुद्धा असा एक कॅफे आहे. या कॅफेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, कादंबऱ्या वाचू शकता. कल्याण स्थानकापासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या अगरवाल कॉलेजच्या अगदी बाजूलाच हे द बुक मार्क कॅफे आहे.
advertisement
या कॅफेची सुरुवातच वाचनप्रिय असणाऱ्या लोकांसाठीच करण्यात आलेली आहे. इथे इतकी पुस्तके आहेत की इथे येणाऱ्या प्रत्येकालाच ती पुस्तके उघडून वाचावीशी वाटतात. यामध्ये अगदी मराठी, इंग्रजी, हिंदी या सगळ्या भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत. कॅफेचे वातावरण सुद्धा अगदी शांत असल्यामुळे अनेक जण संध्याकाळी आवर्जून कॅफेला भेट देतात.
जेवणावरनं व्हायची नवऱ्यासोबत भांडणं, बायको वैतागली अन् घेतला निर्णय, आता पैसाच पैसा!
पुस्तकांच्या संगतीत रेंगाळण्याबरोबरच इथलं फूड सुद्धा खूप कमाल लागतं. कॉफी पीत पुस्तक वाचण्यास अनेकांना आवडतं. इथे मिळणारी कॉफी अनेकजण इथे आल्यावर प्रेफर करतात. कॉफीमध्ये इथे तुम्हाला दहाहून अधिक प्रकार मिळतील. चहासाठी सुद्धा एक कॅफे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही जर पार्टीसाठी आला असाल, इथे मिळणारा पिझ्झा तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवा. यामध्ये तुम्हाला अल्टिमेट फोर चीज पिझ्झा, चिकन अँड हॅम पिझ्झा, मशरूम पिझ्झा असे पंधराहून अधिक प्रकार मिळतील.
'हल्ली मोबाईलमुळे आपण पुस्तकांचे वाचन करणं सोडून दिलय. लोकांनी पुन्हा वाचावं आणि वाचनाकडे वळावं यासाठी आम्ही हे कॅफे सुरू केलं. म्हणूनच या कॅफेचे नाव आम्ही द बुक मार्क असं ठेवलं आहे. अनेक मित्रमंडळी, जोडपी कॅफेत येऊन पुस्तक वाचण्याला प्राधान्य देतात,' असे द बुक मार्क कॅफेचे मॅनेजर सुमंत यांनी सांगितले.
इथे मिळणारे चायनीज फूड हे यांचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच मोमोज, पास्ता आणि इतरही फास्ट फूडचे पदार्थ इथे मिळतात. तुम्हाला जर पार्टी करायची असेल आणि त्यासाठी सुंदर अस्थेटिक डेकोरेशन असणारे ठिकाण हवं असेल तर तुमच्यासाठी द बुकमार्क' कॅफे अगदी परफेक्ट लोकेशन ठरेल.