मुंबई : महाराष्ट्रात जशी बारा मैलांवर भाषा बदलते तशी तेथील खाद्य संस्कृतीही बदलते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशाची एक वेगळी खाद्य संस्कृतीही आहे. मुंबईची खास ओळख असलेल्या वाडापाव पैकी एक म्हणजे विदर्भ वडापाव. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहिला मिळते. या ठिकाणी 20 रुपयांपासून वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव खायला मिळतात.
advertisement
कोणी केली सुरुवात?
सुनील वाघ यांच्या वडिलांनी 2 फेब्रुवारी 1972 ला अंधेरी येथील वैभव हॉटेल शेजारी विदर्भ वडापाव या नावाने वडापावची गाडी सुरू केली होती. आज विदर्भ वडापावचे 5 सेंटर मुंबईमध्ये आहेत. या ठिकाणी 20 रुपयांपासून ते 100 रुपयांच्या आत वेगवेगळे वडापाव मिळतात. त्यामुळे हे वडापाव खाण्यासाठी खवय्ये या ठिकाणी मोठी गर्दी करतात.
फरसाणपासून ते वेफर्सच्या अनेक व्हरायटी, 10 रुपयांपासून करा खरेदी, दिव्यात फेमस आहे दुकान
कोण कोणते मिळतात प्रकार?
ठेचा वडापाव 30 रूपये, मिओनिझ वडापाव 35 रुपये, अमुल बटरवडापाव 50 रुपये, शेझवान वडापाव 35 रुपये, क्रिस्पी वडापाव 45, क्रिस्पी चीज वडापाव 55 रुपये, मिसळ चीज वडापाव 99 रुपये अश्या विविध प्रकारचे वडापाव याठिकाणी मिळतात.
famous medu vada : स्वस्तात मस्त नाश्ता, चवही भारी, मेदूवड्याला तर लोकांची खूपच पसंती, हे आहे लोकेशन
कुठे कुठे आहेत सेंटर?
विदर्भ वडापावचे मुंबईत विले पार्ले, अंधेरी, मीरारोड या ठिकाणी सेंटर आहेत. या ठिकाणी खव्य्यांची मोठी गर्दी वडापाव खाण्यासाठी असते, अशी माहिती सुनील वाघ यांनी दिली आहे.