TRENDING:

वडापाव पेक्षा स्वस्त नाष्टा, फक्त 15 रुपयांमध्ये, डोंबिवलीत एकच गर्दी

Last Updated:

डोंबिवली जितक महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे इथलं साऊथ इंडियन फूड सुद्धा खूप फेमस आहे. तुम्हाला सुद्धा चविष्ट मेदुवडा आणि इडली सांबार खाण्याची इच्छा असेल, आम्ही तुम्हाला एक बेस्ट लोकेशन सांगणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी साऊथ इंडियन पदार्थांची मेजवानी मिळते. डोंबिवली जितक महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे इथलं साऊथ इंडियन फूड सुद्धा खूप फेमस आहे. तुम्हाला सुद्धा चविष्ट मेदुवडा आणि इडली सांबार खाण्याची इच्छा असेल, आम्ही तुम्हाला एक बेस्ट लोकेशन सांगणार आहोत.

डोंबिवली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या कॅफे चटणी सांबारमध्ये फक्त 15 रुपयांना इडली आणि चटणी मिळते. यांच्या इथे मिळणार साऊथ इंडियन फुड अगदी ऑथेंटिक आहे. त्यामुळे अनेक डोंबिवलीकर आवर्जून सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा इथे साऊथ इंडियन फूड खाण्यासाठी जातात. कॅफे चटणी सांबार हे क्लाऊड किचन असल्यामुळे सकाळपासूनच यांची डिलिव्हरी ऑर्डर सुरू होते. तुम्हालाही इथे जाता येणार नसेल तर घरबसल्या या पदार्थांची चव ऑनलाइन ऑर्डर करून तुम्ही नक्की घेऊ शकता.

advertisement

पनीर ते क्रिमी पावभाजी, डोंबिवलीतील एकाच ठिकाणी खा पावभाजीचे 10 हुन अधिक प्रकार, Video

मंडळी इथे मिळणारी घी पोडी इडली तर इतकी चविष्ट लागते की आवर्जून डोंबिवलीकर याची ऑर्डर देतात. वरून मस्त चमचे भरून घी आणि चटणी सांबार सोबत याची टेस्ट कमाल लागते. मेदू वडा आणि त्यासोबतच इथे मिळणारा उत्तप्पा तर कमाल आहे. तुम्ही जर डोसा लवर असाल तर इथे मिळणारा बेंगलोर घी रोस्ट मसाला डोसा तुम्हाला खूप आवडेल. हा डोसा बनवताना खूप घी टाकलं जातं आणि त्यावर तिथे मिळणारी बटाट्याची भाजी तर खूपच चविष्ट आहे. विशेष म्हणजे साऊथ इंडियन फुडमध्ये इथे मिळणारा सगळ्यात ऑथेंटिक पदार्थ म्हणजे पाईन एप्पल शिरा.

advertisement

अजिंक्य जोग या मराठी तरुणाने या व्यवसायाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. अजिंक्यचे शिक्षण मास मीडियामधून झालेलं असून त्याने आवड म्हणून या व्यवसायाकडे वळण्याचं ठरवलं. आता मात्र त्याच्या या व्यवसायाला डोंबिवलीकरांचा आणि संपूर्ण ठाणे, मुंबईकरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'मी दोन वर्षांपूर्वी या व्यवसायाला सुरुवात केली. क्लाऊड किचन या उद्देशानेच कॅफे चटणी सांबार याची सुरुवात झाली. आमचे ऑनलाईन ऑर्डर सकाळी सात वाजल्यापासून सुरू होतात. माझं शिक्षण मास मीडियामधून झालेलं असलं तरी सुद्धा कॉलेज संपल्यानंतर लगेचच मी आवड म्हणून हा व्यवसाय सुरू केला आणि आता डोंबिवलीकरांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे' असे व्यावसायिक अजिंक्य जोग यांनी सांगितले.

advertisement

तुम्हाला सुद्धा कॅफे चटणी सांबारचे ऑथेंटिक साऊथ इंडियन फुड खाण्याची इच्छा असेल तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या कॅफेला भेट द्या किंवा यांच्या ऑनलाईन साईट वरुन फूड ऑर्डर करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
वडापाव पेक्षा स्वस्त नाष्टा, फक्त 15 रुपयांमध्ये, डोंबिवलीत एकच गर्दी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल