पनीर ते क्रिमी पावभाजी, डोंबिवलीतील एकाच ठिकाणी खा पावभाजीचे 10 हुन अधिक प्रकार, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
डोंबिवलीकरांची इथे कायमच पावभाजी खाण्यासाठी गर्दी असते. यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येक पावभाजीची टेस्ट वेगळी लागेल.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली : पावभाजी हा पदार्थ सध्या सगळ्यांचाच आवडीचा झालेला आहे. तुम्ही जर डोंबिवलीकर असाल आणि तुम्हाला चविष्ट पावभाजी कुठे मिळते हे जाणून घ्यायचं असेल तर डोंबिवलीमध्ये तुमच्यासाठी एक बेस्ट लोकेशन आहे. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या पावभाजी पांडा येथे पावभाजीचे 10 हुन अधिक प्रकार मिळतात. डोंबिवलीकरांची इथे कायमच पावभाजी खाण्यासाठी गर्दी असते. यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येक पावभाजीची टेस्ट वेगळी लागेल आणि यांच्या पावभाजीची किंमत फक्त 110 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
पावभाजी सोबतच या पावभाजी पांडामध्ये तुम्हाला मसाला पाव, चविष्ट पुलाव आणि चायनीज सुद्धा मिळेल. इथल्या सूप आणि डेझर्टचे सुद्धा अनेकजण चाहते आहेत. पावभाजीमध्ये तुम्हाला या पावभाजी पांडामध्ये अमूल बटर पावभाजी, पनीर पावभाजी, झणझणीत अशी कोल्हापुरी पावभाजी, चिजी पावभाजी, क्रिमी पावभाजी असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. यांच्या इथे मिळणारे पावभाजी कॉम्बो सुद्धा अनेकजण घेतात. ज्यामध्ये तुम्हाला अमूल बटर पावभाजी कॉम्बो यात बटर पावभाजी आणि हाफ तवा पुलाव मिळेल. तर पनीर पावभाजी कॉम्बोमध्ये तुम्हाला पनीर पावभाजी आणि हाफ तवा पुलाव मिळेल.
advertisement
'आमची पावभाजी डोंबिवलीकरांची आवडती आहे त्यामागे अनेक कारण आहेत. आम्ही कधीच पावभाजी बनवताना जुन्या भाज्या किंवा मसाले वापरत नाही. त्याच दिवशी बनवलेलं त्याच दिवशी संपत आणि यामुळेच कोणालाही पावभाजी खाल्ल्यानंतर त्रास होत नाही. पावभाजी सोबतच आमच्या कडील चायनीजच सुद्धा डोंबिवलीकर चाहते आहेत' असे पावभाजी पांडेच व्यावसायिक ओमकार यांनी सांगितले.
advertisement
तुम्हाला सुद्धा या सगळ्या पावभाजींची चव घेण्याची इच्छा असेल तर आवरून डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या गणेश मंदिर रोडवरील गणेश मंदिरच्या अगदी समोरच हे पावभाजी पांडाचे लोकेशन आहे तिथे जा आणि मस्त चमचमीत पावभाजी आणि त्यासोबत चायनीज ट्राय करा.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
January 14, 2025 5:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पनीर ते क्रिमी पावभाजी, डोंबिवलीतील एकाच ठिकाणी खा पावभाजीचे 10 हुन अधिक प्रकार, Video