पुण्यातल्या नितीन यांनी सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, सुरू केला जगातला पहिला अनोखा आईस्क्रीम ब्रँड
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील नितीन दिवटे यांनी इंजिनिअरिंगची नोकरी सोडून स्वतःचा सिरी नावाने आईस्क्रीमचा ब्रँड तयार केला आहे. जगातील पहिले व्हेगन आईस्क्रीम तयार केले असून 16 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर हे यामध्ये पाहायला मिळतात.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुणे तिथे काय उणे! असं नेहमीच म्हटलं जातं आणि जे पुण्यात तयार होत ते जगात कुठेही विकले जाऊ शकतं. पुण्यातील नितीन दिवटे यांनी लाखोंचे पॅकेज असणारी इंजिनिअरिंगची नोकरी सोडून स्वतःचा सिरी नावाने आईस्क्रीमचा ब्रँड तयार केला आहे. जगातील पहिले व्हेगन आईस्क्रीम तयार केले असून 16 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर हे यामध्ये पाहायला मिळतात. हे आईस्क्रीम ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून बनवले जातं. तर ही संकल्पना नेमकी कशी सुचली याबद्दच आपल्याला नितीन दिवटे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
मूळ संकल्पना काय?
पुण्यातील नितीन दिवटे यांची एपीएल चीज अँड क्रीम (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्यांनी धान्यापासून हे आईस्क्रीम बनवले असून याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल ही यामागची मूळ संकल्पना आहे. धान्यापासून बनणाऱ्या या आईस्क्रीमप्रमाणे इतर वेगवेगळे पदार्थही ते तयार करतात आणि त्याला चांगली बाजारपेठ ही मिळते आहे. या आईस्क्रीममध्ये 16 वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर असून झिरो कोलेस्ट्रॉल आहे, असं नितीन दिवटे सांगतात.
advertisement
यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर, स्वीटनर्सचा वापर नसून हे पूर्णपणे व्हेगन आईस्क्रीम आहे. धान्य आणि प्युअर फ्रुट प्युरी हे दोन्ही मिक्स करून ही आईस्क्रीम तयार केली जाते. सीताफळ, आंबा, फणस, पेरू, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, खजूर, जांभूळ, फिल्टर कॉफी असे वेगवेगळे फ्लेवर हे यामध्ये पाहायला मिळतात.
advertisement
याचे टेक्नॉलॉजी पेटंट हे आम्ही घेतले असून फूड लायसन्स ऑथेरिटी ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्मेंट महाराष्ट्र शासन तसेच तामिळनाडू सरकारचे सर्टिफिकेट हे आहेत. आता हे पुण्यात जवळजवळ पाच ठिकाणी असून फूड जंक्शन, कल्याणी नगर, औंध, वाकडं आणि कसबा पेठ या ठिकाणी आईस्क्रीम विक्री ही केली जाते, अशी माहिती नितीन दिवटे यांनी दिली आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 14, 2025 12:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पुण्यातल्या नितीन यांनी सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, सुरू केला जगातला पहिला अनोखा आईस्क्रीम ब्रँड